ऑटो शेअर्ससह 'या' पाच कारणांमुळे आज बाजारात मोठी रॅली

मोहित सोमण: आजची बाजारातील रॅली ही प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरून दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा प्रभाव पडल्याने झालेली असल्याचे वरकरणी दिसली असली तरी त्याला इतर कारणांचीही किनार आहे. नक्की ती काय कारणे आहेत जाणून घेऊयात…


१) ऑटो शेअर्समध्ये झालेली प्रचंड मोठी वाढ -ऑटो शेअर्समध्ये सकाळी प्रचंड मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने ही वाढ दुचाकी, चारचाकी किंमतीमध्ये संभाव्य घसरणीमुळे होण्याची शक्य ता वर्तवली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात जीएसटीत सरलीकरण, पुनर्रचना, व मोठ्या प्रमाणात जीएसटीत कपात करण्याचे त्यांनी घोषित केले. त्यामुळे आगामी काळात ५%,१८ % जीएसटीत असे दोनच स्लॅब्सच राहणार आहेत अश्याच पद्धतीने सरकारने संभाव्य दरकपातीचा फायदा ऑटो क्षेत्राला पोहोचवल्यास दुचाकी, चारचाकीतील किंमती घसरण्याची शक्यता आहे जी सध्या २८% कराने जीएसटी आकारणी केली जाते.त्यामुळे आज शेअर बाजारात ऑटो समभागात (Stocks) मध्ये रॅली पहायला मिळाली आहे.प्रामुख्याने आज सकाळच्या सत्रात हिरो मोटोकॉ र्प, मारुती सुझुकी, होंडाई मोटर्स, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस मोटर्स या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः सकाळी सत्र सुरू झाल्यावरच ऑटो समभा गात ४.५६% इतकी मोठी वाढ झाली होती. ज्याचा निश्चितच फायदा बाजाराला होत आहे.


२) जीएसटी आकारणी अपेक्षित परिवर्तन (Reforms) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मोठ्या प्रमाणात करात कपात करण्याचे घोषित केले यासंबंधी सरकारने समितीने नेम ली असून हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्र्यांना दिला गेला आहे. लवकरच याविषयी घोषणा होऊ शकते. पुर्वीच्या टॅक्स स्लॅब्स काढून केवळ ५%,१८% असे दोन प्रकार राहू शकतात. ज्यामध्ये सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात लागत असलेल्या, अथवा जीवनावश्यक वस्तू, कंज्यूमर ड्युरेबल्स अशा उत्पादनावर सरकार मोठ्या प्रमाणात जीएसटी कपात करणार आहे. केवळ चैनी च्या वस्तूंवर आणि काही वस्तूंवर १८% कर राहू शकतो. या घोषणेनंतर गुंतवणूकदारांच्या आशा वाढल्या असल्याने शेअर बाजारातील फंडामेंटलला आज टेक्निकल सपोर्ट मिळाला असे म्हणता ये ऊ शकते.


३) एस अँड पी ग्लोबलने दिलेले रेटिंग - एस अँड पी ग्लोबलने आपल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले होते. तसेच जागतिक पातळीवरील या रेटिंग एजन्सीने भारताला BBB+ रे टिंग वाढल्याने मोठ्या प्रमाणात सगळ्याच प्रकारच्या बहुतांश कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूती दिसून आली. भारताचे वित्तीय धोरण, वाढलेल्या भांडवली खर्चामुळे (Capital Expenditure)अर्थव्य वस्थेतील अनुकुलता या कारणामुळे भारताला रेटिंगमध्ये बढती दिल्याने ही वाढ झाली होती. ज्याचा बाजारातील सेटिमेंटवर फरक पडला.


४) मिडकॅप स्मॉलकॅप समभागात झालेली वाढ- ज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये नाही तर छोट्या व मध्यम आकाराच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला आज सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. त्यामुळे ही रॅली १% हून अधिक सुरू असल्याने बाजारात वाढ झाली.


५) जागतिक अनुकूलता- जागतिक पातळीवरील रशिया व युएस गाठीभेटी,चीन अमेरिका आगामी बैठक,युक्रेन व युएस आगामी बैठक, भारत व युएस यांच्यातील तोडगा निघण्याची शक्यता अ शा विविध कारणांमुळे बाजारात आश्वासकता निर्माण झाली.तिमाही निकालांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदारांनी तरलता (Liquidity) इनकॅश करण्याचे ठरविल्याने बा जार उसळले. याविषयी बोलताना बाजार तज्ञ अजय बग्गा यांनी,'सोमवारी अमेरिका-ईयू-युक्रेन नेत्यांमधील व्हाईट हाऊस बैठकीतून जग भौगोलिक-आर्थिक संकेत शोधत आहे' असे बाजारातील अनुभवी अजय बग्गा म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की,व्यापार तणाव कायम असूनही, रशियाशी संबंधित वाटाघाटींमध्ये संभाव्य विरघळणे जागतिक बाजारपेठांना दिलासा देऊ शकते.'असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

विदेशी चलन साठ्यात ७०२.२८ अब्ज डॉलर्सपर्यंत जबरदस्त वाढ आरबीआयच्या माहितीत आकडेवारी समोर

प्रतिनिधी:भारताच्या विदेशी चलनसाठ्यात (Foreign Exchange Reserves) संकलनात ४.४९६ अब्ज डॉलरवरून ७०२.२८ अब्ज डॉलर वाढ झालेली

Kotak Q2FY26 Results: बड्या खाजगी कोटक महिंद्रा बँकेचा तिमाही निकाल आत्ताच जाहीर- अतिरिक्त तरतुदीमुळे केल्याने एकत्रित करोत्तर नफ्यात ११% घसरण

मोहित सोमण: काही क्षणापूर्वी देशातील बडी खाजगी बँके कोटक महिंद्रा बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

REIL: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडची भारतातील एआय इकोसिस्टिम उभारण्यासाठी मोठी घोषणा

मोहित सोमण: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण उपकंपनी

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून रशियन तेल आयात कपातीविषयक मोठे स्पष्टीकरण अद्याप सस्पेन्स कायम !

मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती