भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले आहे. धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे . धरणसाखळीतील भुतोंडे, मळे, पांगारी खोर्‍यात होत असलेल्या पावसाने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पावसाचा जोर कमी होता . त्या वेळी धरणात 92 टक्के पाणी साठा होता.


भाटघर धरणाची क्षमता २३ टीएमसी आहे. एकूण ८१ दरवाजे असून, ४५ स्वयंचलित, ३६ अस्वयंचलित आहेत. स्वयंचलित दरवाजातून १४०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे विभाग, पुणे येथील कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी