दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. रास्ता वाहून गेल्याने कुंभारवाडी आणि काही वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. याच मार्गाने नळपाणी योजनेकडे जाण्याची सोय असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.

हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मेन रोडला जोडणारा असून कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. तसेच मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचविण्यात आली होती. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याठिकाणी जाऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपासरपंच, तसेच सदस्य व गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली आहे.याबाबत ज़िल्हापरिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असून याघटनेची माहिती घेतली जाईल व सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपयोजना करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण