भारतात आयफोन १७ च्या उत्पादनाला सुरूवात


मुंबई : पलसाठी स्मार्टफोन तयार करणारी फॉक्सकॉन कंपनीने भारतात आयफोन १७ चे उत्पादन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उत्पादन बेंगळुरू येथील नव्या प्रकल्पात सुरू झाले असून या युनिटमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनबाहेर फॉक्सकॉनची ही दुसरी सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग साइट आहे.


याआधी चीनने भारतात आयफोन बनवणारे ३०० हून अधिक अभियंते व तंत्रज्ञ अचानक परत बोलावून घेतले होते. त्यामुळे आयफोन १७ च्या उत्पादनात अडथळा निर्माण झाला होता. आता कंपनी तैवानसह इतर देशांतून तज्ज्ञांना बोलावून हा तुटवडा भरून काढत आहे. सध्या भारतात आयफोन १७ चे उत्पादन मर्यादित प्रमाणात सुरू आहे.


चीनी अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत होते


फॉक्सकॉनच्या हाय-टेक असेंब्ली लाईन, कारखाना डिझाईन आणि भारतीय कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम चीनी अभियंते करत होते. यासाठी भारत सरकारने त्यांना विशेष व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली होती, जेणेकरून उत्पादनात कोणतीही अडचण येऊ नये.


अमेरिका बाजारात भारत आघाडीवर


भारत आता चीनला मागे टाकत अमेरिकेला स्मार्टफोनचा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. एका रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत अमेरिकेत आयात झालेल्या स्मार्टफोनपैकी तब्बल ४४ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ होते. गेल्या वर्षी ही टक्केवारी फक्त १३ टक्के होती. दुसरीकडे, चीनचा हिस्सा याच कालावधीत ६१ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.


भारत आयफोन मॅन्युफॅक्चरिंग हबकडे वाटचाल करत


जून २०२५ पर्यंत भारतात २.३९ कोटी आयफोन तयार झाले असून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ७८ टक्के आयफोन भारतातच बनवले जात आहेत. २०२४ च्या तुलनेत या उत्पादनात तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एका रिसर्च अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात भारतातून निर्यात झालेल्या आयफोनची संख्या २.२८ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.५० कोटी होता, म्हणजेच वार्षिक तुलनेत ५२टक्के वाढ झाली आहे.


भारत सरकारच्यामेक इन इंडियाउपक्रमामुळे आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढल्यामुळे भारत आयफोन उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात झपाट्याने जागतिक हब बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



Comments
Add Comment

पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या