WhatsApp New Feature : WhatsApp वर कॉलिंगची स्टाईल बदलणार! शेड्युलिंगपासून हँड रेजपर्यंत नवे फीचर्स लॉन्च

सध्याच्या काळात व्हॉट्सॲप हा सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप म्हणून ओळखला जातो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत जवळजवळ प्रत्येकजण संवादासाठी व्हॉट्सॲपचा वापर करताना दिसतो. युजर्सच्या सोयीसाठी आणि त्यांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी कंपनी वेळोवेळी नवनवीन फीचर्सची भर घालत असते. मेसेजिंग, कॉलिंग आणि स्टेटस अपडेट्ससाठी आतापर्यंत अनेक आकर्षक फिचर्स व्हॉट्सॲपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे युजर्सना नेहमीच काहीतरी नवीन अनुभव मिळतो. आता पुन्हा एकदा कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी खास आणि वेगळं असं नवं फीचर आणलं आहे. हे फीचर विशेषतः व्हॉट्सॲप कॉलिंगसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या अपडेटमुळे युजर्सना कॉलिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुधारित आणि सोयीस्कर मिळणार असून, संवाद साधण्याची पद्धतच एका नव्या स्तरावर नेली जाणार आहे.



व्हाट्सअप ग्रुपमधील कॉल पहिल्यापेक्षा अधिक सोपा, इंटरॲक्टिव आणि ऑर्गनाइज बनवण्यासाठी कंपनी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. या फीचरमध्ये कॉल शेड्युलिंग, इंटरव्हेटिव टूल्स आणि कॉल लिंक सारख्या सुधारणांचा समावेश आहे. यामुळे युजर्स आधीच कॉल प्लॅन करू शकणार आहेत आणि त्यांची इतर कामं मॅनेज करू शकतील. ज्यामुळे जेव्हा कॉल करायचा असेल तेव्हा युजर वेळ काढून ग्रुपमधील इतर लोकांशी संवाद साधू शकतील आणि त्यांना यावेळी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.




शेड्युलिंग, इंटरॲक्टिव टूल्स आणि कॉल लिंकची सोय


व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. आता कंपनीने ग्रुप कॉलिंग अधिक सोपा, इंटरॲक्टिव आणि ऑर्गनाइज्ड बनवण्यासाठी एक मोठा बदल जाहीर केला आहे. या नव्या अपडेटमुळे युजर्सना ग्रुप कॉल्सचा अनुभव पूर्वीपेक्षा खूपच वेगळा आणि सोयीस्कर मिळणार आहे.
या फिचरमध्ये कॉल शेड्युलिंग, इंटरॲक्टिव टूल्स आणि कॉल लिंक अशा महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. युजर्स आता कॉल आधीच शेड्युल करून ठेवू शकतील, ज्यामुळे त्यांची दैनंदिन कामं व्यवस्थित मॅनेज करता येतील. ठराविक वेळेनुसार कॉलमध्ये सहभागी होता येणार असून, अचानक येणाऱ्या कॉल्समुळे होणारा व्यत्यय टळणार आहे. कॉल लिंक फीचरमुळे युजर्सना ग्रुप कॉलमध्ये इतरांना सहज जोडता येणार आहे. यामुळे मित्रपरिवार, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांशी संवाद साधणे आणखी सोपं होणार आहे. व्हॉट्सॲपचे हे अपडेट खासकरून कामकाज, मिटिंग्ज आणि कौटुंबिक संवाद अधिक सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.


यात कॉल शेड्युलिंग, इंटरॅक्टिव्ह टूल्स आणि कॉल लिंक ही महत्वाची फीचर्स समाविष्ट आहेत. कंपनीचा उद्देश असा आहे की, मग तो कॅज्युअल ग्रुप चॅट असो, मित्रमैत्रिणींसोबतचा ग्रुप कॉल असो किंवा मग ऑफिसमधील प्रोफेशनल मीटिंग प्रत्येक गोष्ट अधिक मजेदार, सोपी आणि प्रॉडक्टिव्ह व्हावी. कॉल शेड्युलिंग फीचर युजर्ससाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. आता तुम्ही अगोदरच ठराविक वेळ निश्चित करून ग्रुप कॉल आयोजित करू शकणार आहात. यामुळे अचानक येणाऱ्या कॉल्समुळे कामांमध्ये होणारा व्यत्यय टळेल. कॉल शेड्युल करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.




व्हॉट्सॲपवर कॉल शेड्युल करण्याची प्रक्रिया



  • कॉल टॅब उघडा – सर्वप्रथम व्हॉट्सॲप ॲप ओपन करून कॉल टॅबमध्ये जा. तिथे असलेल्या “+” (प्लस) बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर कॉल शेड्युल हा पर्याय निवडा.

  • तारीख आणि वेळ निवडा – शेड्युल ऑप्शन निवडल्यानंतर स्क्रीनवर तारीख आणि वेळ टाकण्याची सुविधा दिसेल. आपल्या सोयीप्रमाणे कॉलसाठी योग्य दिवस आणि वेळ निवडा.

  • ग्रुपला आमंत्रण द्या – ठराविक वेळ निवडल्यानंतर एक कॉल लिंक तयार होईल. ती लिंक तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करून सर्व सदस्यांना कॉलसाठी आमंत्रित करू शकता.

  • शेड्युल्ड कॉल पाहा – तुम्ही शेड्युल केलेले कॉल थेट कॉल टॅबमध्ये दिसतील. इथे तुम्हाला अटेंड करणार्‍यांची यादी (Attendee List) तसेच तो कॉल आपल्या कॅलेंडरमध्ये ऍड करण्याचा ऑप्शन उपलब्ध असेल.

  • नोटिफिकेशनची सोय – ठराविक वेळेपूर्वी कॉलमध्ये सामील होणाऱ्या सर्व युजर्सना नोटिफिकेशन मिळेल, ज्यामुळे कुणाचाही कॉल चुकण्याची शक्यता कमी होईल.



व्हॉट्सॲपवर आता तुम्ही शेड्युल केलेले सर्व कॉल्स थेट कॉल टॅबमध्ये एकाच ठिकाणी पाहू शकणार आहात. त्यामुळे प्रत्येक कॉल स्वतंत्रपणे लक्षात ठेवण्याची गरज उरणार नाही. याशिवाय, तयार झालेली कॉल लिंक तुम्ही सहजपणे ग्रुपमध्ये किंवा इतर व्यक्तींना शेअर करू शकता. त्यामुळे फॅमिली गेट-टुगेदर, मित्रमंडळींचे कॅज्युअल ग्रुप कॉल्स किंवा अगदी ऑफिस मीटिंग्स सुद्धा सोयीस्करपणे आयोजित करता येणार आहेत. याचबरोबर कंपनीने व्हॉट्सॲप कॉलिंगमध्ये काही नवीन इंटरॅक्टिव्ह फीचर्सही दिली आहेत. त्यात हॅन्ड रेस (Hand Raise) आणि रिअ‍ॅक्शन्स यांचा समावेश आहे. त्यामुळे आता कॉल्स अधिक मजेदार आणि संवादात्मक होणार आहेत. उदाहरणार्थ, जर कॉल दरम्यान समोरचा व्यक्ती बोलत असेल आणि तुम्हाला मधेच आपलं मत मांडायचं असेल, तर तुम्ही हॅन्ड रेस फीचरचा वापर करून आपली उपस्थिती दर्शवू शकता.

Comments
Add Comment

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

तृप्ती देसाईंचे इंदुरीकर महाराजांना ओपन चॅलेंज

अहिल्यानगर : लग्नासाठी कर्ज काढून मोठा खर्च करणे टाळा, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून नागरिकांना केले

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

Disney vs Youtube Update: युट्यूब टीव्ही दर्शकांसाठी मोठी बातमी: डिस्ने युट्यूब वादाला ब्रेक

करार अखेर संपन्न यूट्यूब टीव्हीमध्ये डिस्ने कंटेट पुन्हा पूर्ववत होणार प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय