कोकण नगर या गोविंदा पथकाने ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात चक्क दहा थर लावण्याची कमाल केली आहे. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते. कोकण नगर या गोविंदा पथकाने हे आव्हान पेलले आणि ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात दहा थर लावून सलामी दिली. काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत कोकण नगर या गोविंदा पथकाने १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच.