गेल्या दोन दिवसापासून जालन्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असं या अधिकाऱ्यांचे नाव आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मात्र हा पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला लाथ का मारली काय कारण आहे हे सविस्तर पाहुयात. १५ ऑगस्ट असल्याने मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी अनेकजण भेटीगाठी घेत असतात अश्यामध्येच पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवल्याच्या रागातून पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याचे समोर आलं.
त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून अमित चौधरी आणि गोपाल चौधरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पत्नीचे कुटुंबीयांनी तिचे परस्पर लग्न लावून दिले असल्याचा आरोप असून कुटुंबांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चौधरी यांनी स्वातंत्र्यदिनी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी चौधरी यांना बाजूला करताना अगदी फिल्मी स्टाईलने पाटी येऊन उडी मारून कमरेत लाथ मारली.
यानंतर कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. मात्र यानंतर अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले असून ही व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी गेली होती आणि त्याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतले. पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरही त्याने डिझेल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बळाचा वापर केला, असे कुलकर्णी यांनी म्हटलं.