Trump-Putin Alaska Meet: अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन यांच्यात सकारात्मक बैठक, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये काय झाल्या चर्चा? जाणून घ्या सविस्तर

अलास्का: डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये झालेली बैठक आता संपली आहे. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी बैठकीनंतर पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही बैठक सकारात्मक झाल्याचे  म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की अद्याप काही मुद्द्यांवर एकमत झालेले नाही. त्याच वेळी, अलास्कामध्ये बैठक आयोजित केल्याबद्दल पुतिन यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.


त्पूर्वी पुतिन अँकरेज शहरातील जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन लष्करी तळावरून ट्रम्प यांच्या 'द बीस्ट' कारमधून शिखर परिषदेच्या ठिकाणी पोहोचले.  जिथे त्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. त्पूर्वी पुतिन अँकरेज शहरातील जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन लष्करी तळावरून ट्रम्प यांच्या 'द बीस्ट' कारमधून शिखर परिषदेच्या ठिकाणी पोहोचले.  लष्करी तळाच्या आकाशात अमेरिकन लढाऊ विमाने उडताना दिसली.

तब्बल २ तास ४५ मिनिटे चालली बैठक


ही बैठक केवळ रशिया आणि युक्रेनसाठीच नाही तर भारत, अमेरिका, रशिया आणि युक्रेन या ४ देशांसाठी खूप महत्त्वाची होती.  ही बैठक अमेरिकेच्या अलास्का राज्याची राजधानी अँकरेज येथे तब्बल २ तास ४५ मिनिटे चालली. दरम्यान यजमान अमेरिकेने रशियाच्या प्रमुखांचे स्वागत करताना अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्यांचे हवाई  शक्तिप्रदर्शन केले. या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.



बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाल्या?


युक्रेन संघर्षाच्या संभाव्य तोडग्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. व्लादिमीर पुतिन यांनी सात वर्षांनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत पत्रकार परिषद घेतली. सहसा जेव्हा अमेरिका यजमानपद भूषवते तेव्हा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रथम पत्रकारांना संबोधित करतात. परंतु, यावेळी तसे झाले नाही. यावेळी पुतिन यांनी प्रथम पत्रकारांना संबोधित केले. यादरम्यान बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाल्या सविस्तर माहिती घेऊया.


पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला व्लादिमीर पुतिन म्हणाले की, "अमेरिका आणि रशिया महासागरांनी वेगळे असले तरी ते अजूनही खूप जवळचे शेजारी आहेत. मी ट्रम्पशी हस्तांदोलन केले तेव्हा  'नमस्ते शेजारी' असे म्हंटले." त्यानंतर त्यांनी अलास्काच्या इतिहासाची आठवण करून दिली आणि सांगितले की अलास्कातील रशियन ऑर्थोडॉक्स चर्च दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यास मदत करू शकते.


पुतिन पुढे म्हणाले की शीतयुद्धानंतर दोन्ही देशांमधील संबंध सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. परंतु आता ते बदलण्याची गरज आहे. आता संघर्षाऐवजी संवादावर पुढे जाण्याची वेळ आली आहे. पुतिन यांनी युक्रेन युद्धावर देखीक यावेळी भाष्य केले.



रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढणे गरजेचे


पुतीन  म्हणाले की रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रथम त्याची कारणे दूर करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की ट्रम्प त्यांच्या देशाचे तसेच रशियाचे हित समजून घेतात. मला आशा आहे की युक्रेन आणि युरोपीय देश रशियाच्या विकासात अडथळे निर्माण करणार नाहीत. मी ट्रम्प यांच्या चांगल्या हेतूबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच पुतिन पुढे म्हणाले की, जर २०२२ मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असते तर युक्रेनशी संघर्ष झाला नसता आणि रशिया-अमेरिका संबंध सुधारले असते.



डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? 


पत्रकार परिषदेला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पुतिन यांच्याशी त्यांची भेट सकारात्मक होती. काही विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे आणि काही मुद्द्यांवर तोडगा निघू शकला नाही. परंतु हा करार या दोन देशांवर अवलंबून आहे, त्यांना तो मंजूर करावा लागेल. पुढील बैठकीत नाटो सहयोगी देश आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचाही समावेश असेल. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांचे आणि पुतिन यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. परंतु २०१६ च्या निवडणुकीनंतर, रशियन हस्तक्षेपाच्या चौकशीमुळे ते थोडे बिघडले होते.


सदर बैठकीत भारतावर अमेरीकेकडून लादण्यात आलेल्या अवाजावी ५० टक्के टॅरिफवर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे, पण लवकरच याचे निराकरण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अमेरिका: मिशिगनमधील चर्चमध्ये गोळीबार, अनेक लोक जखमी, चर्चला आग

मिशिगन, अमेरिका: अमेरिकेतील मिशिगन राज्यात ग्रँड ब्लँक येथील एका चर्चमध्ये रविवारी गोळीबार झाला. या घटनेत अनेक

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे UNGA मध्ये सडेतोड भाषण: पाकिस्तानला सुनावले खडे बोल

न्यूयॉर्क: भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र

भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बोलती बंद

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या आमसभेत बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी भेट

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख

नेपाळमध्ये आता १६ वर्षांचे तरुणही मतदान करू शकणार

काठमांडू: नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी देशातील मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षांपर्यंत कमी

टायफून रागासा वादळामुळे तैवानमध्ये १४ जणांचा मृत्यू

चीनचे 20 लाख लोक स्थलांतरित हाँगकाँग : वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ, सुपर टायफून रागासा, मंगळवारी(दि. २३)