मुंबई : शहराच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरवून सोडले. प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाची एकुलती एक मुलगी, केवळ ११वीत शिकणारी विद्यार्थीनी, हिने राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना १४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. मुलीचे आई-वडील घराबाहेर गेलेले असताना, तिने गोरेगाव पश्चिमेतील ओबेरॉय स्क्वायर (Oberoi Esquire) या आलिशान इमारतीच्या वरून उडी घेतली. धक्कादायक म्हणजे, ती एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने तिच्या डोळ्यांत होती. अपघातानंतर लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून, ती घरातील एकुलती एक मुलगी होती. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपासादरम्यान मुलीच्या खोलीत किंवा इतरत्र कुठेही सुसाईड नोट न सापडल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात (Pune Accident News) या घटनांत चिंताजनक वाढ झाली आहे. अशाच धक्कादायक ...
लंडनला जाण्याआधीच व्यावसायिकाच्या मुलीची आत्महत्या
गोरेगाव पश्चिम येथील ओबेरॉय स्क्वायर या उंच इमारतीत गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. बांधकाम व्यावसायिकाची एकुलती एक मुलगी, वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी, राहत्या घरातूनच बेडरुमच्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ती आपल्या खोलीत एकटी होती. आई-वडील घराबाहेर गेले होते, तर घरात तिचे आजी-आजोबा उपस्थित होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक तिने खिडकीतून खाली उडी घेतली. उंचावरून कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक प्रसंगाचा साक्षीदार ठरले इमारतीचे रिसेप्शनिस्ट – ज्यांनी तिला पोडियमवर पडताना पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे, ही मुलगी केवळ काही दिवसांत लंडनला उच्च शिक्षणासाठी रवाना होणार होती. तेथील एका नामांकित विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला होता आणि प्रवासासाठी अवघे १५ दिवस बाकी होते. कुटुंबीय तिच्या उज्ज्वल भवितव्याबाबत स्वप्ने पाहत असतानाच, तिच्या या टोकाच्या पावलाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही मुलगी गेल्या काही वर्षांपासून नैराश्याच्या (डिप्रेशन) आजाराशी झुंज देत होती. तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, नैराश्याच्या छायेतून बाहेर पडण्याआधीच तिने आयुष्य संपवल्याची शोकांतिका घडली. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत ओबेरॉय स्क्वायर संकुलात आत्महत्येच्या घटना वारंवार घडल्या आहेत. या कालावधीत घडलेली ही चौथी आत्महत्या ठरत आहे. यापूर्वी मे महिन्यात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने, तर जुलै महिन्यात २२ वर्षीय अनंत द्विवेदीने उडी मारून आपले जीवन संपवले होते. आता व्यावसायिकाच्या मुलीच्या मृत्यूमुळे या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले आहे. या आत्महत्यांच्या मालिकेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, एकाच संकुलात वारंवार घडणाऱ्या अशा घटना चिंताजनक ठरत आहेत. परिसरातील नागरिकांतही अस्वस्थता निर्माण झाली असून, मानसिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.