मुंबईत मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आज पहाटे शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची बातमी आहे.


विक्रोळी पार्कसाईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची शक्यता असते, यंदाच्या पावसाळ्यापूर्वीही महानगरपालिकेने हा भाग धोकादायक म्हणून घोषित केला होता, त्यामुळे येथे राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही इथे अनेक लोकं राहत होती. दरम्यान कालपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे या भागात दरड कोसळण्याची घटना घडली. यात मिश्रा कुटुंबीयांचे घर दरडीखाली गाडले गेले. ज्यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मिश्रा कुटुंबांच्या घरावर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबीयांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, सुरेश मिश्रा (वय ५०) आणि शालू मिश्रा ( वय १९) या बापलेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (वय ४५) आणि ऋतुराज मिश्रा (वय २०) या आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या दुर्घटनेनंतर आता पालिकेकडून दरड कोसळलेल्या आजुबाजूच्या भागातील घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये, यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.


गेल्या महिन्यात, मुंबईतील भांडुपमध्ये काही तासांच्या मुसळधार पावसानंतर एका निवासी भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती. मात्र त्या भागातील काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती, ज्यामुळे कोणतीही दुखापत झाली नव्हती.

दरम्यान, शनिवारी मध्य रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचू लागले आहे.  भारतीय हवामान खात्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसह अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, पुणे, सातारा आणि जळगाव येथे मुसळधार पाऊस आणि वादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील

वायू गुणवत्ता मापन प्रणाली न बसणाऱ्या प्रकल्पांची बांधकामे थांबवली

तब्बल १०६ बांधकामांना बजावल्या स्टॉप वर्कची नोटीस मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या