मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, १५ डब्यांच्या फेऱ्या दुप्पट होणार

मुंबई : मुंब्रा येथे शेजारून जाणाऱ्या गाडीचा धक्का लागल्यामुळे दारात लटकत असलेल्या प्रवाशांचा रुळांवर पडून मृत्यू झाला होता. यानंतर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या विस्ताराचे काम पण वेगाने सुरू आहे. यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंत १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होणार आहे. धीम्या मार्गावरही १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांत फलाट विस्ताराचे रेल्वेचे नियोजन आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २१० फेऱ्या धावतात. सीएसएमटी-कल्याण लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवर थांबते. उर्वरीत रेल्वे स्थानकांत फलाटांची लांबी पुरेशी नसल्यामुळे लोकलचा थांबा देण्यात आलेला नाही. सीएसएमटीतील केवळ फलाट क्रमांक सातची लांबी १५ डबा लोकल फेऱ्या चालवण्यासाठी योग्य आहे. यामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लोकल गाडी उभी करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर सीएसएमटी आणि कल्याण यार्ड अशा दोनच ठिकाणी लोकल गाडी उभी करण्याचा पर्याय आहे.

धीम्या मार्गावर १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दोन टप्प्यांत १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार प्रस्तावित आहे. पहिल्या टप्यात कर्जत मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांचा आणि दुसऱ्या टप्प्यात कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांतील फलाटांचा समावेश आहे. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. यामुळे सीएसएमटी ते ठाणे जलद आणि ठाण्याच्या पुढे धीमी अशा अर्धजलद लोकलचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकूर्ली रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही १५ डबा लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब