कभी खुशी कभी गम...SBI ग्राहकांना चांगली व वाईट बातमी व्याजदरात वाढ तर MCLR दरात कपात 'हे' आहे गृहकर्ज व वाहनकर्ज दर !

  31

मोहित सोमण: तुम्ही घर अथवा गाडी खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी एक चांगली आणि वाईटही बातमी आहे. वाईट बातमी म्हणजे देशाची सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या गृह व वाहन कर्जाती ल (Home and Car Loan) व्याजदरात वाढ केली असली तरी आपल्या एमसीएलआर (Margin Cost of Funds based Lending Rate MCLR) मध्ये ३५ बेसिस पूर्णांकाने म्हणजेच ०.०५% घसरण केली आहे. गृह व वाहन कर्जात मात्र केवळ नव्या कर्जदा रावर २५ बेसिस पूर्णांकाने व्याजदरात वाढ केली आहे. याचा फटका केवळ ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला नाही त्यांना बसणार आहे. कालपासून एसबीआयने तारण कर्ज ७.५% वरून ८.४५% वाढवले‌ तर नवीन तारण कर्ज घेत असलेल्या ग्राहकांना ७.५० ते ८.४ ५% व्याजदरासह कर्ज भरावे लागणार आहे. जुलै महिन्यात युनियन बँक ऑफ इंडियानेही ७.३५% वरून ७.४५% वर वाढवले होते. सध्याच्या अस्तित्वातील कर्ज ग्राहकांना Borrowers) फ्लोटिंग दराची आकारणी कर्जावर केली जाणार आहे. प्रसारमाध्यमांनी दि लेल्या एका वृत्तानुसार बँकेने हा निर्णय कर्जावरील मिळकत उत्पादकता वाढवण्यासाठी घेण्यात आला. मागच्या तिमाहीत बँकेची घसरलेली नफ्यातील कामगिरी, घसरलेले मार्जिन यामुळे बँकेने हा निर्णय घेतला.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गृह आणि कार कर्जावरील व्याजदर यापूर्वी कमी केले होते मात्र आता २५ बेसिस पूर्णांकाने वाढवले आहेत. हे नवीन दर १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले. तरी देखील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) म ध्ये ०.०५% कपात केल्याने कमी होतील, ज्यामुळे अस्तित्वात असलेल्या कर्जदारांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे फ्लोटिंग व्याजदरात वाढ होणार असली तरी एमजीएलआर मध्ये घसरण केल्याने हफ्ते (EMI) पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियशिवाय युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाचे दर वाढवले आहेत, ज्यामुळे बाजार उच्च व्याजदरांकडे वळण्याची शक्यता आहे, विशेषतः कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या कर्जदारांवर याचा परिणाम होईल होऊ शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे. कमी नफ्याचे मार्जिन आणि वाढत्या स्पर्धेबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, खाजगी कर्जदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वापरलेल्या आक्रमक किंमत धोरणांबद्दल आक्षेप व्यक्त केले आहेत.

MCLR म्हणजे नक्की काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट हा कर्जासाठी बँक आकारू शकणारा किमान व्याजदर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल २०१६ मध्ये सुरू केलेल्या एमसीएलआर (MCLR) ने पॉलिसी दरामधील बदल जलद प्रसारित करण्यासाठी बेस रेट सि स्टमची जागा घेतली आहे.एमसीएलआरशी जोडलेले कर्ज घेतलेल्या कर्जदारांना( Borrowers) दर पुनर्रचित (Restructuring) केल्यावर त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) बदल जाणवतात.हे बदल कर्जाच्या रिसेट कालावधीवर अवलंबून असतात, म्हणजेच क र्जदारांना सध्याच्या एचसीएलआर (MCLR) दर आणि त्यांच्या कर्जाच्या कालावधीनुसार त्यांच्या ईएमआय (EMI) मध्ये वाढ किंवा घट दिसू शकते. तथापि, वैयक्तिक कर्जदारासाठी अंतिम कर्ज दर पगार, उत्पन्न पातळी आणि सीबील (CIBIL) स्कोअर यासार ख्या अनेक घटकांवर आधारित बदलू शकतो. बँका कर्जदाराच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि कर्जावरील अंतिम व्याज दर निश्चित करण्यासाठी या घटकांचा वापर करतात. या कपातीमुळे फ्लोटिंग-रेट होम लोन असलेल्या कर्जदारांना फायदा हो ईल, जिथे व्याजदर कालांतराने चढउतार होतात.नवीन कर्जदारांसाठी कर्ज घेण्याची ही एक आदर्श (Ideal) वेळ आहे कारण व्याजदर कमी आहेत, ज्यामुळे ईएमआय कमी होतो आणि पर तफेड करणे सोपे होते. कार कर्ज अर्जदारांनाही या दर कपातीचा फाय दा होईल.

दरम्यान नुकतीच एसबीआयने अग्निवीरांसाठी विशेष कर्ज योजना सुरू केली. स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या अल्पकालीन अग्निपथ भरती कार्यक्रमांतर्गत अग्निवीरांसाठी विशेष वैयक्तिक कर्ज योजना सुरू करण्याची घोष णा केली होती.या कर्ज योजनेअंतर्गत, एसबीआयमध्ये पगार खाते असलेले अग्निवीर कोणत्याही तारणाशिवाय आणि प्रक्रिया शुल्कात पूर्णपणे माफीसह ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात, असे बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

विशेषतः एसबीआयच्या किरकोळ कर्ज देण्याच्या पोर्टफोलिओमध्ये गृहकर्ज हा सर्वात मोठा भाग आहे. ज्यामुळे एसबीआयला अधिकचा महसूल मिळण्यास मदत होईलच परंतु असेट क्वालिटी कायम राखताना खर्चातही कपात करणे शक्य होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने १ ऑगस्टपासून गृहकर्जाच्या व्याजदरांची वरची श्रेणी (Upper Band) वाढवली तरी सुरुवातीची श्रेणी (Starting Band) बदललेली नाही. एकूण एसबीआय गृहकर्जाचे सध्याचे व्याजदर ७.५०% ते ८.७०% पर्यंत आहेत. एसबीआय गृहकर्ज मॅक्सगे न ओडी व्याजदर ७.७५% ते ८.९५% पर्यंत आहेत. टॉप-अप गृहकर्जासाठी, व्याजदर ८.२५% ते १०.७५% पर्यंत आहेत. सुधारित गृहकर्जाचे दर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होतील. बँक १५ जून २०२५ पासून ईबीएलआर (External Benchmark Lending R ate EBLR) ८.१५% + क्रेडिट रिस्क प्रीमियम (Credit Risk Premium CRP) + बिझनेस स्ट्रॅटेजी प्रीमियम (BSP) असा बाह्य बेंचमार्क कर्ज दर (EBLR) देत आहे.

तसेच, १५ जूनपासून रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) ७.७५% + सीआरपी (CRP) आहे.एसबीआयच्या नियमित गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या ०.३५% अधिक जीएसटी आहे, ज्यावर किमान २००० रुपये अधिक लागू जीएसटी आणि कमाल १०० ०० रुपये अधिक जीएसटी लागू आहे.ऑगस्ट २०२५ मध्ये, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँकेने, व एचडीएफसी बँकेने त्यांचे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) कमी केले, तर कॅनरा बँक आणि इंडियन बँकेने त्यांचे दर अपरिवर्तित ठेवले होते. जून महिन्यातच आरबीआयचा वित्तीय पतधोरण समितीची निकाल जाहीर झाला होता त्यामध्ये रेपो दर स्थिर ठेवण्यात आले होते.
Comments
Add Comment

WhatsApp New Feature : WhatsApp वर कॉलिंगची स्टाईल बदलणार! शेड्युलिंगपासून हँड रेजपर्यंत नवे फीचर्स लॉन्च

सध्याच्या काळात व्हॉट्सॲप हा सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप म्हणून ओळखला जातो. शाळेत जाणाऱ्या

Colliers India: तंत्रज्ञान क्षेत्राची भारतातील ऑफिस लिजिंग मध्ये मक्तेदारी कायम ४०% जागा केवळ आयटीची

मागणीतील निम्मा वाटा बंगलोर, व हैद्राबाद शहराचा कॉलियर्स इंडियाने अभ्यासातून नवी माहिती समोर मोहित सोमण:

मोठी बातमी - जीएसटी दर कपातीसाठी सरकार अँक्शन मोडवर केंद्रीय मंत्र्यांना प्रस्ताव सादर

प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डबल गिफ्ट ाछा वास्तवात मिळणार आहे ‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ठाण्यात या गोविंदा पथकाने लावले १० थर, टाळ्यांच्या कडकडाटात झाले कौतुक

ठाणे : मुंबई ठाण्यासह सर्वत्र दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. गोविंदा पथके दहीहंडी

Sholay turns 50 : ‘शोले’ चित्रपटाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष! अमिताभ–धर्मेंद्र–हेमा–संजय यांची मैत्री सांगणारे ९ खास फोटो पहा

शोलेच्या शूटिंगदरम्यानचा एक कॅन्डिड क्षण म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अमिताभ बच्चन यांनी काढलेल्या

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, १५ डब्यांच्या फेऱ्या दुप्पट होणार

मुंबई : मुंब्रा येथे शेजारून जाणाऱ्या गाडीचा धक्का लागल्यामुळे दारात लटकत असलेल्या प्रवाशांचा रुळांवर पडून