पियुष गोयल यांनी फार्मा उद्योगातील शिष्टमंडळाची भेट घेतली

प्रतिनिधी: फार्मा क्षेत्रात मोठे बदल होणार का? याचे संकेत मिळत आहेत. तसे कारणही आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी फार्मा उद्योगातील वरिष्ठांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत फार्मास्युटिकल क्षेत्रातील उद्योगातील आ व्हाने,उद्योगातील भरभराटीसाठी आवश्यक असलेली रणनीती तसेच क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेला रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) यावर सविस्तर चर्चा झाल्याची बातमी पुढे आली आहे. या बैठकीत उत्पादन वाढवण्याबरोबरच उत्पा दकता वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. याविषयीची माहिती स्वतः पियुष गोयल यांनी एक्सवर पोस्ट लिहित दिली आहे. ते म्हणाले आहेत की,'भारतातील औषध उद्योगातील नेत्यांशी प्रेरणादायी संवाद साधला.स्पर्धात्मकता (Compeitit veness) वाढवण्यासाठी आणि संशोधन आणि विकास परिसंस्था पुढे नेण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली.'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या दृष्टिकोनातून प्रेरित,आमचे सरकार जागतिक आरोग्य सेवा मूल्य साखळीत भारताचे स्थान आण खी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.' असे ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत. विशेषतः कठीण भूराजकीय संदर्भात व बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते. फार्मा उत्पादनांवर टॅरिफचे संकट घोंघावत असताना यावर फार्मा उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे सरकारचे धोरण होते. फार्मा कंपनीच्या निर्यातीतील वाढीव नुकसान टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बदललेल्या परिस्थितीचा पाठपुरावा करण्यासाठी फार्मा शिष्टमंडळाने पियुष गोयल यांची भेट घेतली.

भारतातील औषध उद्योगातील नेत्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि संशोधन आणि विकास परिसंस्था पुढे नेण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली. 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या दृष्टिकोनातून प्रेरित आम चे सरकार जागतिक आरोग्य सेवा मूल्य साखळीत भारताचे स्थान आणखी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताच्या औषध निर्यातीपैकी सुमारे ४० टक्के निर्यात अमेरिकेत झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अमे रिकेच्या एकूण औषध आयातीत भारताचा वाटा ६ टक्के होता. २०२५ मध्ये बेन अँड कंपनीने प्रकाशित केलेल्या दुय्यम बाजार संशोधन विश्लेषणानुसार, २०२३ मध्ये मूल्याच्या बाबतीत भारतीय औषध निर्यात जागतिक स्तरावर ११ व्या क्रमांकावर होती आणि एकू ण औषध निर्यातीपैकी ३ टक्के होती. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मासिक व्यापार (Monthly Trade Report) आकडेवारीनुसार, जुलै २०२५ मध्ये व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत वाढ होण्याचे प्रमुख घटक म्हणजे अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रत्ने आणि दागिने, औषधे आणि औषधनिर्माण आणि सेंद्रिय आणि अजैविक रसायने यांचा समावेश आहे.

औषधनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स आणि अर्धवाहक, ऊर्जा उत्पादने आणि काही खनिजे, तांबे, लाकूड, सोने आणि ऑटोमोबाईल्स आणि ऑटो घटक हे शुल्कातून वगळण्यात आलेले क्षेत्र आहेत. मात्र तरीही ट्रम्प यांच्या धमकीनंतर फार्मा उत्पादनावर आगामी वर्षात २ ००% टॅरिफची धमकी दिल्याने सध्या फार्मा उत्पादक नवीन बाजारपेठेत प्रवेश शोधू शकतात.  उपलब्ध माहितीनुसार,औषधे आणि औषधांची निर्यात जुलै २०२४ मध्ये २.३३ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १४.०६ टक्क्यांनी वाढून जुलै २०२५ मध्ये २.६६ अब्ज अमे रिकन डॉलर्स झाली आहे. कंपनी सन फार्मास्युटिकल, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सिप्ला, बायोकॉ न, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्मा आणि झायडस (झायडस लाईफसायन्सेस) यासारख्या प्रमुख भारतीय औषध कंपन्यांचा अमेरिकन बाजारपेठेत सर्वाधिक वाटा आहे.
Comments
Add Comment

कधी होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ?

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यासाठी राज्य

ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहाद्यांची भाषा - मंत्री नितेश राणेंचा घणाघात; राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : 'ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. 'व्होट जिहाद'च्या माध्यमातून हिंदू

BMC Election 2026 : घराबाहेर पडताय? मग आधी हे वाचा! मुंबईतील सायन, कांदिवली आणि मालाडमध्ये वाहतुकीत मोठे फेरबदल; पाहा पर्यायी मार्ग

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या

मराठमोळ्या बँक ऑफ महाराष्ट्राचा मजबूत तिमाही निकाल जाहीर! नफ्यात २६.५१% वाढ इतरही आकडेवारी मजबूत

मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने आपल्या तिमाही निकालाची घोषणा केली आहे. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY)

डिसेंबर महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक महागाईत किरकोळ वाढ 'ही' आहे आकडेवारी

मोहित सोमण: केंद्र सरकारच्या नव्या आकडेवारीनुसार यंदाच्या ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) महागाईत इयर ऑन इयर

Meta Layoff: मेटाकडून 'या' विभागात १०% कर्मचारी कपात जाहीर १५०० जणांना नारळ मिळणार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सेंटर प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने मेटा (Meta) कंपनीने १५०० कर्मचाऱ्यांना नारळ