याच दिवशी जेव्हा धोनीने घेतली होती निवृत्ती, रैनानेही केली होती घोषणा, भावूक झाले होते चाहते





मुंबई: आजपासून बरोबर पाच वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट २०२० रोजी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एका मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच त्यांचे सहकारी सुरेश रैना यांनीही हाच निर्णय जाहीर केला. या दोन दिग्गजांच्या निवृत्तीला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.


महेंद्रसिंग धोनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून हा निर्णय जाहीर केला होता. ‘मला नेहमीच मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून मला निवृत्त समजले जावे,’ अशा भावनिक संदेशासह धोनीने ही घोषणा केली. यानंतर काही वेळातच सुरेश रैनानेही धोनीसोबतचा एक फोटो शेअर करत ‘माही तुमच्यासोबत खेळणे खूप छान होते. या प्रवासात तुमच्यासोबत सामील होण्याचा मला अभिमान आहे. धन्यवाद भारत. जय हिंद!’ असे लिहित आपल्या निवृत्तीची घोषणा केली.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)





या दोन्ही खेळाडूंच्या या निर्णयाने क्रिकेट जगतासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. धोनीने आपल्या शांत आणि संयमी नेतृत्वाने भारतीय संघाला २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. तर सुरेश रैना मधल्या फळीतील एक महत्त्वाचा फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो.


त्यांच्या या निवृत्तीनंतरही दोघांची मैत्री कायम आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्यांची जोडी अनेकदा पाहायला मिळाली आहे. आजही हे दोन्ही खेळाडू क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून आहेत आणि त्यांच्या निवृत्तीची ही पाच वर्षे त्यांच्या कारकिर्दीची आठवण करून देत आहेत.







Comments
Add Comment

The Great Khali : रेसलर खलीचा पंजाबमधून सोनीपतला जाताना अपघात

पानीपत : प्रसिद्ध कुस्तीपटू आणि WWE स्टार द ग्रेट खलीच्या कारचा शनिवारी पानीपत टोल प्लाझाजवळ अपघात झाला. पंजाबमधून

Women Asia Cup T20 : महिला आशिया कप २०२६: भारताची सलामीची लढत थायलंडशी

दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघ थायलंडविरुद्ध महिला आशिया कप टी-२० स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. गेल्या

Neeraj Chopra : नीरज चोप्राला घोट्याच्या दुखापतीमुळे मोठा धक्का; आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६ चा हंगाम संपुष्टात

सरावादरम्यान घोट्याच्या अस्थिबंधाला (ligament tear) झालेल्या गंभीर दुखापतीमुळे भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा

Indian women's hockey team : भारतीय महिला हॉकी संघासाठी ५० लाख रुपयांच्या रोख पुरस्काराची घोषणा; विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक पाचवे स्थान

बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे पार पडलेल्या २०२६ च्या एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक पाचवे स्थान

Budapest Squash Open : वेलावन सेंथिलकुमारची फायनलमध्ये धडक; बुडापेस्ट स्क्वॉश ओपनमध्ये हंगेरीच्या स्टारशी रंगणार लढत

बुडापेस्ट : भारताचा स्टार स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमारने PSA बुडापेस्ट स्क्वॉश ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत

FIH Hockey World Cup : जर्मनीवर ३-१ असा दणदणीत विजय; भारतीय महिला हॉकी संघाची विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी

ॲमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने FIH महिला हॉकी विश्वचषक २०२६मध्ये शानदार कामगिरी करत पाचव्या स्थानावर