सततच्या पावसामुळे पपनसावर किडीचा प्रादुर्भाव

गळ कीड रोगावर संशोधनाची मागणी


नांदगाव मुरुड : सतत बरसत राहणाऱ्या पावसामुळे कोकणातील पपनस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पपनसाच्या पिकाला पावसामुळे लागणाऱ्या गळ रोगांवर तसेच त्यावर पडणाऱ्या कीड रोगावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत येथील बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.


पपनस हे फळ रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन या तालुक्यातील विशेषतः समुद्र किनारी भागात श्रावण महिन्यापासून तयार होणारे नारळ-सुपारीच्या भागांतील एक प्रमुख आंतरपीक आहे. या पिकांच्या उत्पादनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात येथील बागायतदारांना चार पैसे हमखास मिळतात. मुरुड तालुक्यासह ठाणे, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातील ग्राहकांचीही या फळांना मोठी मागणी असते.
विशेषतः कोकणातील गौरीच्या ओवशांच्या सुपामध्ये पपनसाच्या फळांना मोठे स्थान मिळते. गणपतीच्या मखराचीही पपनसाची पिवळी हिरवी फळे शोभा वाढवितात. ऐन पावसाळी हंगामात ही फळे तयार होत असल्याने अशा दमट वातावरणात तयार फळांना कीड लागते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे तयार फळांना गळ लागते. आळ्यांनी पोखरल्याने फळे नासण्याची शक्यता जास्त असते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे साहजिकच पपनस फळांची गळ वाढली आहे.


गणेशोत्सवाला आता दहाबाराच दिवस राहिले असून तयार पपनस फळांचा सडा बागायतीत पडलेला दिसून येत असल्याने यावर्षी येथील बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कृषी विभागानेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर

जिल्ह्यात ८ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी

यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, भाजीपाला लागवड अलिबाग : भाताचे कोठार म्हणून रायगडाची ओळख पुसली

परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा कौल

डॉक्टर, वकील शिक्षित उमेदवारांना मतदारांनी नाकारले ! राहुल देशमुख कर्जत : नगराध्यक्षपदासाठी परिवर्तन विकास

नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून उड्डाणे

नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

अलिबागमध्ये शेकापला रोखण्यात भाजप, शिवसेना अपयशी

उबाठाचे दोन शिलेदार विजयी, भाजपाला एकच जागा सुभाष म्हात्रे अलिबाग : अलिबाग नगर परिषदेत महाविकास आघाडीतील

रोहा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची