Bengluru Blast: बेंगळुरूमध्ये स्फोट! १० वर्षीय मुलाचा मृत्यू , तर १२ जण जखमी

बेंगळुरू: शुक्रवारी बेंगळुरूमधील विल्सन गार्डनच्या चिन्मयनपाल्य भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सदर घटना नेमकी १५ ऑगस्ट रोजी घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची खबर मिळताच, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विल्सन गार्डनमध्ये घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. स्फोटातील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



सिलिंडरच्या भीषण स्फोटात अनेक घरांचे नुकसान


सिलेंडर स्फोटाची ही घटना दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागात घडली, जिथे घरे एकमेकांना लागून होती. स्फोट इतका जोरदार होता की ८ ते १० घरांचे नुकसान झाले.  जेव्हा स्फोट झाला तेव्हा एकामागून एक सर्व घरांनी पेट घेतला आणि ही सर्व घरं पत्त्यासारखी कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले.


अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात सिलेंडरमधून गॅस गळती हे स्फोटाचे कारण मानले जात आहे. स्फोटानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि बचाव पथके सतत काम करत आहेत. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर कोणताही अपघात होऊ नये म्हणून जवळपासची घरे रिकामी करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि गॅस पुरवठ्याशी संबंधित सर्व पैलू तपासले जात आहेत.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक