काही क्षणांपूर्वी अमिताभ कांत यांचे मोठे विधान 'ट्रम्प यांच्या टॅरिफला..'

  33

मोहित सोमण: 'वाढलेले टुरिजम' हे ट्रम्प यांच्या टॅरिफ संकटाला उत्तर आहे असे विधान निती आयोगाचे माजी प्रमुख अमिताभ कांत यांनी केले आहे. काही क्षणापूर्वी झालेल्या एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधान केले आहे. याशिवाय 'संकट हीच उत्तम 'संधी 'असून या संधीचा अर्थव्यवस्थेसाठी भरपूर फायदा करून घेतला पाहिजे' असेही कांत म्हटले आहेत. टुरिझम उद्योगावर प्रश्न विचारला असता, 'टुरिजम क्षेत्र हा आपला कणा आहे. सरकारने पर्यटनाला (Tourism) ला सक्षम करण्यासाठी २०००० कोटीं ची तरतूद करावी असे अमिताभ कांत म्हणाले आहेत. याविषयी बोलताना,नक्कीच जागतिक पातळीवर संकट आहे पण हीच भारताला नवीन पर्याय शोधण्याची संधी आहे. आपण यानिमित्ताने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जे आवश्यक असेल ते केले पाहि जे. जे जे शक्य होईल ते करून भारताचा व्यापार जगभर नेत आपण भरारी मारू शकतो ' असे म्हटले.

टॅरिफविषयी बोलताना त्यांनी म्हटले,'अमेरिका ही जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठी अर्थव्यवस्था आहे हा जगातील एकमेव देश आहे की केवळ त्यांच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी जगाच्या अर्थव्यवस्थेतील २६% असून जागतिक अर्थव्यवस्थेतील ४६% मार्केट कॅपिटला यझेशन सर्वाधिक युएसचे आहे.' असे असले तरी पुढे बोलताना ते म्हणाले,'तरीही भारताने टॅरिफ असो अथवा दुसरा प्रश्न भारताने आता मागे हटण्याची गरज नाही. आपण कुठलीही तडजोड न करता करार केला पाहिजे. आपल्या शर्तीवर केला पाहिजे. आज तड जोड केल्यास दीर्घकालीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे आपण चांगल्या स्थितीत आहोत आपण टुरिझम आणि इतर क्षेत्रात नव्या संधी उभारल्या पाहिजेत. आज केवळ एकच असा देश आहे चीन की त्यांनी करारासाठी एक टक्काही तडजोड केली नाही. क धी ट्रम्प वेगळं बोलतात दुसऱ्या दिवशी टॅरिफची वेगळी रक्कम आकारतात. त्यामुळे या कारणामुळे घाबरण्याचे कारण नसून आपण आता अग्रणी होण्याची वेळ आली आहे.' असे अमिताभ कांत सध्याच्या परिस्थितीवर कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कांत यांनी,'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या कर दबावाला बळी पडू नका आणि अमेरिकेवर कोणतेही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्यापूर्वी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले होते.भारताला झुक ण्याची गरज नाही. आपण सध्या प्रत्युत्तरात्मक शुल्क लादू नये कारण आपल्याकडे वाटाघाटी करण्यासाठी अजूनही २० दिवस आहेत' असेही ते म्हणाले होते. तसेच चीनमधून वस्तू आयात करण्याबद्दल बोलताना ते म्हणाले की,चिनी लोकांना अल्पसंख्याक भागभां डवलावर भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम आणि भारतात उत्पादन करण्याची ऑफर दिली पाहिजे. 'चीनमधून आयात करण्याऐवजी,आपण चिनी लोकांना अल्पसंख्याक भागभांडवलावर भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम करण्यास आणि भारतात उ त्पादन करण्यास भाग पाडले पाहिजे आणि त्यामुळे भारत इनपुट उत्पादन आणि घटक उत्पादन दोन्ही करू शकेल आणि मेक इन इंडियाची प्रक्रिया वेगवान करेल आणि भारतात उत्पादन प्रक्रियेला गती देईल आणि आर्थिक वाढीसाठी ते दीर्घकालीन उत्तर आहे' असे कांत म्हणाले होते.
Comments
Add Comment

सिनेमाचा निर्मिती खर्च ४०० कोटी, पहिल्या दिवशीची कमाई ५० कोटी, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यावर पडलं पाणी

मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा एकूण

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार

Gold Silver: स्वातंत्र्यदिनी सोने स्वस्त व चांदी महाग 'हे' आहे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: जागतिक सोन्यात आज घसरण झाल्याने भारतातल्या सराफा बाजारातही सोन्याची किंमत घसरली आहे. काल सोन्याच्या

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करणार

मुंबई : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा

चीनमध्ये खळबळ सात महिन्यातील किरकोळ विक्री निचांकी पातळीवर!

मोहित सोमण: सोमवारी शेअर बाजारात फटका बसेल का? यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प आणि

रत्नागिरी : एसटी डेपोतच डिझेल चोरी, टँकरमध्ये छुपा कप्पा बनवून डिझेल चोरी

मंडणगडमध्ये एसटी डेपोतच डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. एसटी बससाठी डिझेल घेऊन आलेल्या टँकरमधूनच डिझेल चोरी