
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण आणि इतर समारंभाचे थेट प्रक्षेपण वी युजर्सना घरबसल्या पाहता येणार
सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील देशभक्तीपर सिनेमे आणि सीरिजची खास निवडून तयार करण्यात आलेली वॉचलिस्ट
मुंबई:भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वी मूव्हीज अँड टीव्ही या वी (Vodafone Idea) च्या कन्टेन्ट ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्मने नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, देशभक्तीपर सिनेमे आणि प्रीमियम ओटीटी शो हे सर्वकाही एकाच ठिकाणी उप लब्ध करवून देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वी युजर्सना देशाच्या स्वातंत्र्यदिनी जास्तीत जास्त प्रेरणादायी व मनोरंजक अनुभव घेता येईल.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी वी युजर्सना पाहता येईल
थेट प्रक्षेपण: नवी दिल्लीत लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळा, ध्वजारोहण आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण वी मूव्हीज अँड टीव्ही ऍपवर. वी मूव्हीज अँड टीव्ही सबस्क्रिप्शन नसली तरी सर्व वी युजर्स हे पाहू शकतील.
विशेष वॉचलिस्ट: वी मूव्हीज अँड टीव्हीने एक खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट तयार केली आहे. जिओ हॉटस्टार, सोनीलिव, झी५ आणि भारतातील इतर अनेक सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील सर्वोत्तम कन्टेन्ट यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. एक च रिचार्ज करून हे सर्व एकाच ठिकाणी पाहता येईल. अनेक वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन्स न करता फक्त एकाच सबस्क्रिप्शनमध्ये देशभक्तीपर सिनेमे आणि लोकप्रिय सीरिजचा आनंद वी ग्राहकांना घेता येईल. उरी: द सर्जिकल स्ट्राईक (झी५), मुखबीर - द स्टोरी ऑफ अ स्पाय (झी५), सॅम बहादूर (झी५), अवरोध: द सेज विदइन (सोनीलिव), नीरजा (जिओ हॉटस्टार) आणि इतर अनेक सुप्रसिद्ध सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. साहस, त्याग आणि देशाभिमान यांच्या या कहाण्या वी युजर्सना प्रेरक ठरतील.
प्लॅन्सच्या किमती फक्त १५४ रुपयांपासून पुढे आहेत. त्यामध्ये वी मूव्हीज अँड टीव्हीवर तुम्हाला जिओ हॉटस्टार, सोनीलिव, झी ५,शेमारू आणि यासारख्या इतर १७ आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अगदी सहज ऍक्सेस मिळतो. प्रसिद्ध सिनेमे, प्रीमियम शो आ णि थेट प्रक्षेपणे तुम्ही कुठेही कधीही पाहू शकाल.