Thursday, August 14, 2025

येत्या १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत घरोघरी तिरंगा फडकणार, महापालिकेचे नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन

येत्या १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत घरोघरी तिरंगा फडकणार, महापालिकेचे नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन

मुंबई (खास प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे बंदाही २ ते १५ ऑगस्ट २०१५ मा कालावधीदरम्यान 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र शासनाकडून २०२२ पासून 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविले जात आहे. 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा अभिमान आता लोकचळवळ बनली असून या अभियानात महाराष्ट्र राज्याने आणि मुंबई महानगराने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविले जाणार आहे. मुंबई महानगरातही हे अभियान व्यापकपणे आणि अत्यंत उत्साहात राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकपण गगराणी यांनी दिले आहेत.


'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये (वॉर्ड) तिरंगा महोत्सव, तिरंगा मेळा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा बाईक रॅली आणि सायकल रेली, तिरंगा यात्रा, तिरंगा विक्री व वितरण, तिरंगा दौड आणि गॅरेथॉन, तिरंगा ट्रीब्यूट आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच, शाळेच्या भिंती सजवणे, तिरंगा प्रदर्शन, तिरंगा रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी चनविण्याच्या स्पर्धा व कार्यशाळा, तिरंगा विणकाम व धागे सार्वजनिक प्रदर्शन तिरंगा राष्ट्रध्वजाबाबत भावनेचा गौरव करण्यासाठी भारतीय जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान, तिरंगा प्रश्नमंजुषा, घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता : स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेसह आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात वाले आहे.


मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, तसेच तिरंगा राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे. तसेच, 'घरोघरी तिरंगा' अभियानात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा