मोहित सोमण:उद्या स्वातंत्र्य दिना निमित्त व बाजारातील तिमाहीतील निकालावर सकारात्मकता गुंतवणूकदारांना वाटल्याने आज शेअर बाजाराची अखेर वाढीत बंद झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाल्याने सेन्सेक्स ५७.७५ अंकाने व निफ्टी ५०१ १.९५ या किरकोळ अंकांनी वाढला आहे.त्यामुळे सत्र संपताना सेन्सेक्स ८०५९७.६६ व निफ्टी २४६३१.३० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १४१.३९ अंकांने व बँक निफ्टी १६०.४० अंकाने वाढला. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे सकाळची घ सरण अखेरही कायम राहिली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१८%,०.५९% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३१%,०.३८% घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये सका ळची संमिश्रित कामगिरी अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिल्याने आज घसरणीकडे कौल अधिक होता. अखेरच्या सत्रात निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ केवळ कंज्यूमर ड्युरेबल्स (०.७५%), आयटी (०.४०%), फार्मा (०.१०%), पीएसयु बँक (०.१२%), बँ क (०.२९%) निर्देशांकात झाली. सर्वाधिक घसरण मात्र मेटल (१.३९%), रिअल्टी (०.७६%), तेल व गॅस (०.९१%), मिडिया (०.५३%), एफएमसीजी (०.६४%) समभागात झाली आहे.
आज सकाळच्या सत्रात रॅली झाली असताना अखेरच्या सत्रात अपेक्षित वाढ झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मिड स्मॉलकॅपमध्ये झालेली घसरण व जोडीला एफएमसीजी, मेटल, रिअल्टी, मिडस्मॉल हेल्थकेअर समभागात झालेली घसरण यांचा एकत्रित परि णाम झाल्याने बाजारातील रॅली आज मर्यादितच राहिली. किंबहुना सतत घसरत असलेल्या बँक निर्देशांकात मात्र आज वाढ झाल्याने बाजारात आधारभूत पातळी गाठता येणे शक्य झाले आहे. प्रामुख्याने आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही आज घर्षण झाल्या ने बाजार 'Flat' पडण्यास कारणीभूत ठरला. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, इटर्नल, आयसीआयसीआय बँक यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाली असली तरी दुसऱ्या बाजूला टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, वोडाफोन आयडिया, कोटक महिंद्रा बँक यांसार ख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारात किरकोळ वाढ झाली.
आज शेअर बाजारातील रॅलीला आणखी एक कारण म्हणजे काल युएसमधील दोन शेअर्स मार्केटमध्ये झालेली वाढ, व आशियाई बाजारातील निकेयी, हेगंसेंग या सारख्या बाजारातील सकारात्मकता सकाळच्या सत्रात भारतीय बाजारात फळाला आली. दुपारपर्यंत मात्र बाजारात घसरणीचे संकेत मिळत होते मात्र अखेरच्या टप्प्यात पुन्हा हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला आधार मिळाला. दुसरीकडे युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल असे थेट संकेत युएसचे ट्रेझरी सचिवांनी दिल्याने बाजारा तील सेंटीमेंट औत्सुक्याने भारले होते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, सप्टेंबरमध्ये ५० बेसिस पूर्णांकाने (Bps) कपात होण्याची शक्यता असल्याने अमेरिकेतील बाजारातील वातावरणही तेजीत आहे. युएस बाजारातील डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या आगामी शुक्रवारी अ लास्का भेटीवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित आहे. याखेरीज चीनवरील टॅरिफ निर्बंध ९० दिवसांसाठी पुढे ढकलल्याने आशियाई बाजारातील भावना देखील उंचावल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सरासरी घसरण होत असताना आजच्या सकाळच्या सत्रात तेलाच्या दरात घसरण सुरू होती. कालपर्यंत झालेली घसरण ही फेड व्याजदरात कपात होण्याच्या व सीपीआय ( किरकोळ महागाई निर्देशांकातील चांगल्या कामगिरीने होत होती. याशिवाय युएसमध्ये आगामी US Energy Information Administration कडून येणाऱ्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.०५% किरकोळ वाढ झाली होती. तर Brent Future निर्देशांकात ०.१२% वाढ झाली होती.
सोन्याच्या दरातही गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाल्यानंतर सोन्याच्या दरात गेल्या तीन दिवसांपासून घसरण सुरू आहे. सोन्यातील जागतिक घसरण आजही सुरू राहिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात दिवसभरात घसरण झाली. संध्याका ळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१३% घसरण झाली आहे. जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०२% घसरण झाल्याने सोने प्रति डॉलर ३३५५.७५ औंसवर गेले आहे. आज डॉलरच्या दरात फारशी वाढ झाली नसली तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाची ११ पैशाने घसरण झाल्याने बाजारात रूपयाचा आधार मिळाला नाही. परिणामी भारतीय बाजारातील सोन्याचे दर जैसे थे आहेत.आज बीएसईत ४२१५ समभगापैकी १७४२ समभागात वाढ झाली असून २३२० समभागात घसरण झाली आहे. एनएसईत ३०४६ समभगापैकी ११५३ समभागात वाढ झाली असून १७८६ समभागात घसरण झाली आहे. विशेषतः आज एनएसईत ७५ शेअर्स अप्पर सर्किटला असले तरी ६८ समभाग (Stocks) लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मुथुट फायनान्स (९.८६%), कोरोमंडलम इंटरनॅशनल (४.२३%), बजाज हाउसिंग (३.८३%), टाटा कम्युनिकेशन (३.३६%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.७१%), बलरामपूर चिनी (३.१२%), इटर्नल (१.९४%), विप्रो (२.१४%), आदि त्य बिर्ला कॅपिटल (१.२२%), कोफोर्ज (१.२५%), रेडिको खैतान (१.२५%), एसबीआय (०.५७%), एचडीएफसी बँक (०.५५%), आयसीआयसीआय बँक (०.४६%), आदित्य बिर्ला फॅशन (०.४३%) समभागात झाली.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण कोहांस लाईफ (७.३२%), एनएमडीसी स्टील (६.८३%), इंजिनियर्स इंडिया (५.४३%), एचपीसीएल (४.०७%), हिताची एनर्जी (३.४३%), एनएचपीसी (३.२८%), टाटा स्टील (३.०५%), जिलेट इंडिया (२.१३%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (१.९९%),वेदांता (१.९५%), जेपी पॉवर वेचंर (१.८५%), सम्मान कॅपिटल (१.८१%), आरती इंडस्ट्रीज (१.७४%), अदानी एनर्जी (१.३४%), डाबर इंडिया (०.५२%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.७०%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'१४ ऑगस्ट रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी, सकारात्मक पातळीवर बंद झाले, ज्यामुळे सहा आठवड्यांची घसरण सुरू झाली. गुंतव णूकदारांनी अलिकडच्या टॅरिफ-संबंधित चिंता दूर केल्याने दोन्ही निर्देशांकांनी आठवड्यातून सुमारे १% वाढ नोंदवली. बाजाराचे लक्ष आता उद्या अलास्कामध्ये होणाऱ्या अमेरिका-रशिया बैठकीकडे वळले आहे, ज्यामुळे युद्धबंदी होऊ शकते आणि भारतावर ला दलेले अतिरिक्त २५% टॅरिफ रद्द होऊ शकते अशी आशा आहे. शुक्रवारी, निफ्टी १२ अंकांनी किंवा ०.०५% ने वाढून २४६३१.३० वर बंद झाला. निफ्टी आयटी निर्देशांक टॉप परफॉर्मर होता, तर निफ्टी मेटल आणि निफ्टी एफएमसीजी लाल रंगात बंद झाले. व्याप क बाजारपेठा मागे पडल्या, निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक नकारात्मक मध्ये बंद झाले.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांक एका अरुंद श्रेणीत व्यवहार करत होता आणि गुरुवारी तो एका सपाट पातळीवर बंद झाला. आठवड्याच्या शेवटी अमेरिका-रशियाच्या महत्त्वाच्या चर्चेपूर्वी एका ल हान वरच्या सावलीसह त्याने एक लहान बुल कॅन्डल तयार केले आहे. साप्ताहिक चार्टवरील निफ्टीने ६ आठवड्यांची घसरण थांबवली आहे आणि आठवड्यात १% वाढ झाली आहे. तात्काळ ओव्हरहेड रेझिस्टन्स २४७००-२४७५० पातळीच्या आसपास आहे जो गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांक आहे. मागील भाष्यात हायलाइट केल्याप्रमाणे, विद्यमान सुधारात्मक टप्प्यात थांबण्याची पुष्टी करण्यासाठी आठवड्याच्या वेळेच्या फ्रेमवर एक निश्चित उच्च-उच्च आणि उच्च-निच निर्मिती आवश्यक असेल. निर्देशांक २ ४३५०- २४७५० झोनमध्ये दोलन (Oscillate) होण्याची अपेक्षा आहे. २४७५० पातळीवरील निर्णायक उल्लंघनासह मानसिक २५००० हँडलकडे पुलबॅक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यांचा नीचांक जवळजवळ सारखाच २४३३७ पातळीच्या आस पास आहे. त्यानंतरच्या कमकुवतपणामुळे २४२००-२४००० पातळींकडे नकारात्मक बाजू उघडेल कारण २०० दिवसांचा ईएमए (Exponential Moving Average EMA) आणि अलिकडच्या ब्रेकआउट क्षेत्राचा संगम (Integration) आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'दैनिक चार्टवर बँक निफ्टीने १००-दिवसांच्या ईएमए (EMA) च्या आसपास एकत्रीकरण दर्शविणारी तेजीची मेणबत्ती (Bull Candle) तयार केली आहे.निर्देशांक ५४८०० आणि ५६००० पातळीच्या दरम्यान रेंज-बाउंड राहण्याची अपेक्षा आहे, या बँडच्या पलीकडे ब्रेकआउट पुढील दिशात्मक हालचाली निश्चित करेल.५४८००-५५००० झोन हा एक महत्त्वाचा आधार क्लस्टर म्हणून काम करतो, जो १००-दिवसांच्या ईएमए (E MA) आणि मागील अपट्रेंडच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींशी जुळतो. ५४८०० पातळीच्या खाली एक निर्णायक ब्रेक ५४००० पातळीच्या चिन्हाकडे सरकण्याचा मार्ग मोकळा करू शकतो.वरच्या बाजूला, ५५८००-५६००० कॉरिडॉरमध्ये प्रतिकार स्थित आहे, जो ५०- दिवसांच्या ईएमए (EMA) आणि ५७६२८ वरून ५४९०५ पातळीपर्यंतच्या संपूर्ण डाउनस्विंगच्या ३८.२% रिट्रेसमेंटशी संरेखित (Aligned) आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अस्थिर आठवड्याच्या समाप्ती दिवसाच्या सत्रानंतर,अमेरिका-रशिया शिखर परिषदेपूर्वी गुंतवणूकदारांनी साव धगिरीने व्यवहार केल्याने भारतीय शेअर बाजार स्थिर राहिले. अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीत मंदी आणि नकारात्मक दृष्टिकोनामुळे आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये वाढ झाली. वापर-नेतृत्वाखालील पुनर्प्राप्तीच्या आशेवर बँकिंग आणि ग्राहकोपयोगी व स्तूंमध्येही वाढ झाली. तथापि, वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे आणि पुरवठ्याच्या जास्त चिंतेमुळे धातू आणि ऊर्जा निर्देशांकांमध्ये कमकुवत पणा दिसून आला. मजबूत धोरण सातत्य आणि पायाभूत सुविधांवर आधारित वाढीचा हवाला देत, एस अँड पीने भा रताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा आणि त्याचे स्थिर दृष्टिकोन यामुळे देशांतर्गत बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात, बाजार एका घट्ट श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे आणि आगामी भू-राजकीय (Geopolitical) बैठकींकडे पाहण्याचा संमिश्र दृष्टिकोन आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या ट्रम्प-पुतिन बैठकीपूर्वी मंदावलेला ट्रेडिंग सत्र पाहायला मिळाला.जोपर्यंत निर्देशांक २४३३७ पा तळीच्या वर राहील तोपर्यंत एकूणच भावना तेजीच्या ट्रेडला अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूला, २४६६० आणि २४८५० पातळीवर प्रतिकार आहे, तर २४३३७ पातळीच्या खाली घसरण मंदीचा ट्रेंड पुन्हा सुरू करू शकते.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रशिया-युक्रेन शांतता चर्चेवर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या अमेरिका-रशिया बैठकीची बाजारपे ठेत सहभागी झालेल्या सहभागींनी वाट पाहत कॉमेक्सवर सोन्याचा भाव ३३५५ डॉलर्स आणि एमसीएक्सवर १००२८० डॉलर्सच्या जवळपास घसरला. डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याला पाठिंबा मिळाला आहे, तर विविध देशांवरील चालू असलेल्या करांमुळेही त्याची ताकद वाढली आहे. एकूणच, जोपर्यंत ३,२८० डॉलर्स कायम आहेत तोपर्यंत सोने सकारात्मक राहते. सोन्याची श्रेणी ९९,००० ते १,०१,५०० दरम्यान दिसते.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रुपया ०.१० पैसे किंवा ०.१०% ने घसरून ८७.५४ वर बंद झाला, जो डॉलर निर्देशांकात ९७.८३ वर रें ज-बाउंड हालचालींचा मागोवा घेत होता. कच्च्या तेलाच्या किमती अलीकडील नीचांकी पातळीपासून $६३ पर्यंत सौम्य पुनरागमन दर्शवितात. रशिया-युक्रेन युद्धावरील संभाव्य शांतता चर्चेवर शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतिन यांच्या तील महत्त्वाच्या बैठकीपूर्वी बाजार सावध आहेत. रुपया ८७.२५-८८.०० च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,'शुक्रवारी होणाऱ्या युक्रेन संघर्षावरील रशिया-अमेरिका चर्चेपूर्वी गुंतवणूक दा र सावध राहिल्याने निफ्टी २४,६३१ (+१२ अंक) वर स्थिर राहिला. स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतात व्यापार सुट्टी होती. निफ्टी मिडकॅप१०० आणि स्मॉलकॅप१०० प्रत्येकी ०.३% घसरल्याने बाजार मंदावला. क्षेत्रांमध्ये, निफ्टी आयटी हा सर्वात जास्त फायदा देणारा ठर ला ज्यामध्ये इन्फोसिस आणि विप्रो यांचा समावेश होता. कंपनीने ऑस्ट्रेलियन आयटी फर्ममधील बहुसंख्य हिस्सा १५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत खरेदी करण्याची योजना जाहीर केल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स वधारले - सहा महिन्यांपेक्षा कमी कालाव धीत हे तिसरा अधिग्रहण आहे. दुसरीकडे, निफ्टी मेटल (०.९% कमी) आणि निफ्टी ऑइल अँड गॅस (०.७% कमी) मध्ये नफा बुकिंग दिसून आली. व्यापार आघाडीवर, भारतीय वस्तूंवरील वाढलेल्या अमेरिकन शुल्काबद्दल चिंता कायम असल्याने, भारत सरकार एकाच आठवड्यात चीन आणि रशियासोबत उच्चस्तरीय चर्चा करणार आहे. विशेष प्रतिनिधी (SR) यंत्रणेअंतर्गत चर्चेसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री १८ ऑगस्ट रोजी भारताला भेट देणार आहेत, तर भारताचे परराष्ट्र मंत्री २१ ऑगस्ट रोजी रशियाला भेट देणार आहेत.शि वाय, सकारात्मक घडामोडीत, S&P ने जवळजवळ १९ वर्षांच्या अंतरानंतर भारताचे सार्वभौम क्रेडिट रेटिंग 'BBB' पर्यंत वाढवले आहे आणि त्याचा दृष्टिकोन स्थिर आहे. पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाच्या समाप्तीसह, गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी भूराजकीय घडामोडींकडे वळेल, तर बाजार एकत्रीकरणाच्या स्थितीत राहण्याची शक्यता आहे.'
त्यामुळेज आजची निर्देशांकातील परिस्थिती नाजूक असली तरी मजबूत फंडामेंटल हे पुरेसे नाही.सकाळच्या सत्राप्रमाणेच आजही अस्थिरतेचा धोका कायम होता आणि १.५३% पेक्षा अधिक पातळीवर अस्थिरता निर्देशांक (Vix volatility index) उसळल्याने मि डस्मॉलकॅप यांच्यातील घसरणीसह निफ्टी क्षेत्रीय विशेष निर्देशांकांना फटका बसला. उर्वरित उद्याच्या घडामोडींवर व आगामी तिमाहीतील निकालांचा परिणाम उद्याच्या बाजारात गिफ्ट निफ्टीच्या माध्यमातून स्पष्ट होईल.