१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून, राज्यातील राजकारणत तापलं आहे. एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयांच्या निषेधार्थ एक पाऊल उचललं असून एक्सवर पोस्टकरून माहितीही दिली आहे.
ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. इम्तियाज जलील यांनी या निर्णयांच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी मटण आणि चिकन पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीचं निमंत्रणं महापालिका आयुक्तांसह थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिलं आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये , १५ ऑगस्ट रोजी सर्व मांस आणि चिकणची दुकानं बंद ठेवण्याचे तुघलकी फरमान जारी करणाऱ्या सर्व महापालिका आयुक्तांना १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपासून माझ्या निवासस्थानी आयोजित चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं आहे.