गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे . राज्य सरकारने आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवत ३० नोव्हेंबर २०२५ केली आहे . यामुळे आता ज्या वाहनचालकांनी अजून HSRP नंबर प्लेट बसवली नाही त्याना मोठा दिलासा मिळाला आहे.


ज्या वाहनमालकांनी अजून देखील HSRP साठी नोंदणी केलेली नाही अशा वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी . १ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गाड्यांची १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झाली आहे , त्यांना HSRP प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ होती. पण अजून देखील काही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याने शासनाने अखेर आता मुदत वाढवली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आील आहे.


HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही . असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा," असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, "जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये," असा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे .

Comments
Add Comment

मुंबई, पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा तर २० राज्यांना आठवडाभर पाऊस झोडपणार मुंबई (प्रतिनिधी): दोन

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषदेचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

पुढील तीन दिवसात नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन   मुंबई: