वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती


विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ८ जिल्हा उपाध्यक्ष, ८ सचिव, ४ सरचिटणीस आणि एका कोषाध्यक्षाचा समावेश आहे. या कार्यकारणीत तत्कालीन पाच मंडळ अध्यक्षांना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा सचिवपदाची पदोन्नती मिळाली आहे.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, निरीक्षक आमदार विक्रांत पाटील, पालघर विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे,आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे. नव्या जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून राजेश म्हात्रे, दिलीप गायकवाड, जितेंद्र पाटील, गंगेश्वर श्रीवास्तव, सकीना नुरानी, कपिल म्हात्रे, देवराज सिंह आणि नारायण मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हा सरचिटणीस पदी जोगेंद्रप्रसाद चौबे, मनोज बारोट,भूषण किनी आणि विजेंद्र कुमार तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जितेंद्र मेहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, प्रवीण गावडे, हेमलता बाळशी, कुमारी मोहन, अश्विन सावरकर, कल्पेश नाईक आणि शशिकांत दुबे यांना जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपच्या विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या नारायण मांजरेकर, नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, देवराज सिंह आणि कपिल म्हात्रे या पाच मंडळ अध्यक्षांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील