प्रतिनिधी: सध्या भारत व अमेरिका यांच्यातील टॅरिफ वाद आणखी उफाळून येत आहे. भारत अमेरिकेच्या अटींवर न झुकल्याने वैफल्यग्रस्त ट्रम्प आणि त्यांचे अधिकारी भारतावर आरोपांच्या फैरी झाडत आहे. त्याचा पुढील भाग म्हणून युएसचे ट्रेझरी सचिव (ख जिनदार सचिव) स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांनी भारतावर नवा आरोप केला आहे. ते म्हणाले आहेत की,' अजूनही अनेक मोठी डील बाकी आहेत ज्यामध्ये स्वित्झर्लंड व भारत आहेत. युनायटेड स्टेट्सशी बोलणी करताना दक्षिण पूर्व आशियाई देश मात्र 'किं चिंत अविचारी' (Bit Recalcitrant) आहेत.'
यापुढे त्यांनी बोलताना म्हटले आहे की,ऑक्टोबर महिन्यापर्यंत युएस आपल्या व्यापारी वाटाघाटींची सांगता होणार आहे. हो हे महत्वाकांक्षी आहे, कदाचित आम्ही चांगल्या स्थितीत आहोत ' असे म्हणत त्यांनी पुढे म्हटले आहे की,' आम्ही पुढे जाऊ बहुतांश देशांशी आम्ही चांगल्या नोटवर ट्रेड डील केले आहे.'
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर वारंवार धमक्या देत भारतावर अतिरिक्त टॅरिफ ५०% कर लादला होता. ६ ऑगस्टला युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सह्या करत पुढील कालावधीसाठी अतिरिक्त २५% कर लावल्याने आता भारता वर २५% टॅरिफ ट्रम्प यांनी लावला होता. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या आयात निर्यातीला त्याचा फटका बसणार आहे. यापूर्वी ८ जूनला ट्रम्प यांनी २५% कर भारतावर घोषित केला होता. यापूर्वीही ट्रम्प यांनी विविध वक्तव्य करत जगभरातील व्यापारी विश्वात संभ्रम नि र्माण केला होता. फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफची जगभरातील देशांवर घोषणा करत धक्कातंत्र वापरले होते. मात्र निर्णयाची गांभीर्याने दखल घेतल्यावर काही काळासाठी टॅरिफ वाढ पुढे ढकलली होती.
नुकत्याच युएस प्रशासनाने चीनवरील अतिरिक्त कर हटवून कुटनीतीचा वापर केला होता. आता रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना अलास्का येथे भेटण्यापूर्वी स्कॉट बेसेंट यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात अतिरिक्त भारत व युएस यांच्यातील वाद मिटत अतिरिक्त टॅरिफ हटणार का याकडे व्यापारी व गुंतवणूकदार वर्गाचे लक्ष लागले आहे.