
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू सुरेश रैना याचे नाव बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आले असून, अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून त्याला समन्स बजावण्यात आले आहे. रैनाला १३ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई १xBet या बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मच्या चौकशीशी संबंधित आहे. ईडीने रैनाला आज तसेच उद्या सलग दोन दिवस चौकशीसाठी बोलावले असून, त्याचा अधिकृत जबाब नोंदवला जाणार आहे. तपास पथक या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संभाव्य प्रायोजकत्व संबंध आणि प्रचार मोहिमेबाबत माहिती गोळा करणार आहे. यापूर्वी, या प्रकरणाचा तपास करताना ईडीने ‘परिमॅच’ नावाचे आणखी एक बेटिंग ॲप चालवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यासाठी मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई आणि सूरत या सहा शहरांतील एकूण १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे, डिजिटल डिव्हाइसेस आणि बँक खात्यांमधील व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली.

प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला आणखी एक यश प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारने कॅपिटललॅंड ...
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी डिसेंबर २०२४मध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या १xBet या ऑनलाइन बेटिंग ॲपने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नेमणूक केली होती. या करारानंतर कंपनीने सार्वजनिकरीत्या जाहीर केले होते की रैनासोबतची भागीदारी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील चाहत्यांचा सहभाग वाढवेल आणि त्यांना ऑनलाइन बेटिंग करण्यास प्रोत्साहित करेल. मात्र, अलिकडच्या काळात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेटिंगशी संबंधित सर्व ॲप्स आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांशी सुसंगत राहून ईडीने बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कवर सलग तपास मोहिमा राबवल्या आहेत. ईडीचे लक्ष आता केवळ ॲप्स चालवणाऱ्या रॅकेटवरच नाही, तर प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्त्वांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर देखील केंद्रित झाले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, मोठ्या नावांच्या सहभागामुळे सामान्य लोक बेटिंगकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे अशा प्रमोशनल करारांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
२००० कोटींपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा तपास
सदर प्रकरणाचा तपस २०२४ मध्ये झाला, जेव्हा मुंबई पोलिसांनी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान समोर आले की फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून मिळालेली प्रचंड रक्कम म्युल अकाउंट्स किंवा इतर बेकायदेशीर बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम अनेक एजंट्समार्फत देश-विदेशात पसरवली गेली. प्राथमिक आकडेवारीनुसार या गैरव्यवहाराची एकूण रक्कम ₹२००० कोटींपेक्षा जास्त असू शकते, ज्यामुळे हा देशातील मोठ्या ऑनलाइन बेटिंग प्रकरणांपैकी एक मानला जात आहे. या घोटाळ्याशी संबंधित १xBet कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज सुरेश रैनाचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरवले आहे. ही चौकशी आगामी दोन दिवस चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चेन्नई सुपर किंग्समध्ये ‘चिन्ना थाला’ची पुनरागमनाची तयारी
आयपीएल २०२५चा हंगाम चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी निराशाजनक ठरला. संघाला या सत्रात अपयशाचा सामना करावा लागला आणि ते गुणतक्त्यात १०व्या क्रमांकावर राहिले. या कामगिरीनंतर पुढील हंगामासाठी संघरचनेत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स लवकरच माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील करणार आहे. चाहत्यांमध्ये ‘चिन्ना थाला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाच्या पुनरागमनामुळे संघाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सूत्रांनुसार, रैनाची एन्ट्री जवळपास निश्चित झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.