राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार


नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी सात्यकि सावरकरकडून जीवाला धोका असल्याचा दावा करणारा अर्ज सादर केला होता. मात्र, काही तासांतच त्यांनी हा अर्ज राहुल गांधींच्या संमतीशिवाय दाखल केला असल्याचं सांगत यु-टर्न घेतला आहे. राहुल गांधींनी या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे वकील गुरुवारी कोर्टात अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.


पुण्याच्या खास एमपी/एमएलए न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधींच्या वतीने बुधवारी ऍड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात अर्ज सादर करत सात्यकि सावरकर यांच्या वंशपरंपरेमुळे गांधींना त्यांच्याकडून धोका असल्याचं म्हटले होते. अर्जात असं नमूद केलं होतं की, सात्यकि सावरकर यांच्या मातृकुळात महात्मा गांधींच्या हत्येचे मुख्य आरोपी नथुराम गोडसे व गोपाल गोडसे यांचा समावेश आहे, आणि पितृकुळात विनायक दामोदर सावरकर यांचा. सात्यकि यांच्या आई हिमानी सावरकर या गोपाल गोडसे यांच्या कन्या असून त्यांचा विवाह सावरकरांच्या पुतण्याशी झाला होता.


अर्जात हे देखील नमूद करण्यात आलं की गांधी हत्या ही क्षणिक प्रतिक्रिया नव्हे, तर ती एक विचारधारेशी संबंधित योजनाबद्ध कट होता. तसेच, सध्या राहुल गांधी जे राजकीय आंदोलन चालवत आहेत, त्याचा उल्लेख देखील अर्जात करण्यात आला आहे.


संसदेत 11 ऑगस्ट रोजी त्यांनी 'वोट चोर सरकार' असं म्हणत मतदार यादीतील अनियमिततेवर प्रकाश टाकला होता. अर्जात राहुल गांधींना मिळालेल्या दोन धमक्यांचाही उल्लेख आहे एक केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी त्यांना “देशाचा नंबर एक दहशतवादी” म्हटले होते, आणि दुसरी भाजप नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी दिलेली धमकी होती.


सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींवर 2023 मधील लंडन प्रवासात दिलेल्या एका भाषणावरून मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या भाषणात गांधींनी सावरकरांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख केला होता, जिथे कथितपणे एका मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करून आनंद मिळाल्याचं म्हटले गेले होते.


सात्यकि यांनी हा उल्लेख खोटा, भ्रामक आणि मानहानिकारक असल्याचं सांगून, गांधींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 500 अंतर्गत खटला दाखल केला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 357 अंतर्गत भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा