मुंबई महापालिकेच्या आता ‘संपर्क स्मार्ट शाळा’

  14

१८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ


मुंबई : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने विकसित झालेल्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ मुंबई महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळांमधील १८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून अर्थात ऑनलाइन शिक्षण मिळणार आहे. या उपक्रमामुळे शिक्षण विभागातील नवीन संकल्पनांच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकणार आहे.


महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, संपर्क फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर, संपर्क फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. राजेश्चर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयात मंगळवारी १२ ऑगस्ट २०२५ रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे, संपर्क दूरदर्शन संचाचे अनावरण करण्यात आले.


मुंबई महापालिकेच्या परळ, दादर, भायखळा, घाटकोपर, चेंबूर, भांडूप, कुर्ला, सांताक्रूझ, गोरेगांव आणि बोरिवली येथील मिळून एकूण १३५ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षकांच्या क्षमतांचा विकास करणे, अध्यापन पद्धती सोपी करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळेसाठी एलइडी टीव्ही संच, २७३ दूरदर्शन संच, शिक्षकांसाठी स्मार्ट शाळा अ‍ॅप्लिकेशन, पाठ योजना, पाठ्यपुस्तकातील धड्यांवर आधारित २७०० व्हिडिओ, मूल्यमापनासाठी वस्तुनिष्ठ प्रकारातील ३० हजार प्रश्न आदी शैक्षणिक बाबींचा समावेश आहे. यासाठी महापालिकेच्या २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.


यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, शिक्षणाची पुढची पायरी ठरणाऱ्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमात महापालिका सहभागी झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील हा आमूलाग्र बदल आहे. विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यास मदत होणार आहे. महापालिका हा उपक्रम पुढे नेण्यास सक्षम आहे, असे गगराणी यांनी नमूद केले.


संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर यांनी संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाचा विस्तार सांगितला. शैक्षणिक क्षेत्रात येत्या काळात या उपक्रमाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे

मुसळधार पावसामुळे सातही तलावांच्या पाणीपातळीत वाढ

जलाशयातील पाणीसाठा पोहोचला ८९ टक्क्यांवर मुंबई : मुंबईतील पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची

शिवाजी पार्क मैदानातील कचरा पेट्या गायब

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजीपार्क

'अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राच्या कागद वापरु नका '

अन्न व औषध प्रशासनाची सूचना मुंबई : अन्नपदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि

पालिकेच्या भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' तंत्रज्ञ!

मुंबई : एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नातून असे उघड झाले आहे की, मुंबईतील भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' प्रयोगशाळा