Wednesday, August 13, 2025

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन जिल्हांना अद्याप पालकमंत्री न मिळाल्याने झेंडा फडकवण्याचा पालकमंत्र्यांना असणारा मान कोणाला मिळणार याकडे इच्छुकांचे डोळे लागून होते. मंगळवारी अखेर ही प्रतीक्षा संपली. नाशिकला गिरीश महाजन तर रायगडला अदिती तटकरे झेंडावंदन करणार असल्याचे निश्चित झाले. पण या दरम्यान छगन भुजबळ यांना गोंदिया येथे झेंडावंदनाची जबाबदारी देण्यात आली. मात्र छगन भुजबळ यांनी ही जबाबदारी नाकारल्याची बातमी समोर येत आहे.



या कारणांमुळे दिला ध्वजारोहणाला नकार


छगन भुजबळ यांनी तब्येतीच्या कारणास्तव ध्वजारोहणाची जबाबदारी नाकारली असल्याचे वृत्त आहे. झेंडावंदनास गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांना गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे हालचाल करणे शक्य नसल्याने त्यांची उपस्थिती शक्य नव्हती. त्यामुळे गोंदियात छगन भुजबळ यांना ही जबाबदारी देण्यात आली मात्र आता तब्येतीच्या कारणास्तव भुजबळ यांनी ध्वजारोहणास नकार दिल्याने आता गोंदियाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आली आहे.

Comments
Add Comment