अन्न व औषध प्रशासनाची सूचना
मुंबई : अन्नपदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये. मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधा सारखी अप्रिय घटना घडणार नाही याची जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी केले आहे. अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांनी १८०० २२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही प्रकारची तक्रार करावी.असे आवाहन त्यांनी केले आहे.
सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल,वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याअानुषंगे जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.