जिल्ह्यातील परहूर गावात नवीन कारागृहाची उभारणी

हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना अडचणींचा करावा लागतोय सामना


अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये प्रशस्त कारागृह नसल्याने सध्या अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना ठेवण्यात येत आहे. याठिकाणी कैद्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अलिबाग तालुक्यातील परहूर येथे शासनाच्या जागेत नवीन कारागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अलिबागमधील हिराकोट किल्ल्यात जिल्हा कारागृह आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा भार या कारागृहावर पडत आहे. सध्या जिल्हा कारागृहात २०० पेक्षा अधिक कैदी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांवर लक्ष ठेवताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील परहूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहात ५०० ते १ हजार कैदी राहू शकणार आहेत. त्यामुळेच परहुर येथे शासनाच्या जागेत नव्यान कारागृह बांधण्याचा निर्णय घेण्य़ात आल्याचे समजले.

दुसरीकडे या कारागृह उभारणीला परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. काही ग्रामस्थांनी कौटुंबिक निवारा म्हणून काही क्षेत्रांवर पक्की घरे बांधलेली आहेत. या क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरणामार्फत झाडांचे रोपणही झाले आहे. कारागृहाच्या बांधकामामुळे हजारो वृक्षांची कत्तली होणार आहे. त्यामुळे येथे बांधकाम करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.दरम्यान, परहूर येथे प्रस्तावित कारागृहाची क्षमता ५०० ते १ हजार कैदी असणार आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत मोजणी पूर्ण करून कारागृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.

त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातही कारागृह बांधकामासाठीचा प्रस्ताव तयार आहे. ४.६६ एकर जागेत कारागृह बांधकाम होणार आहे. अलिबाग येथील जिल्हाकारागृहात कैद्यांसाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेकवेळा मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तळोजा येथील कारागृहात न्यावे लागते. तेथून पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी वेळ आणि जादा मनुष्यबळ खर्ची पडत असतो, तर काही किरकोळ गुन्ह्यातील गुन्हेगारांना पोलीस कस्टडीसाठी पोयनाड, मांडवा, रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात ठेवावे लागते.
Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या