जन्माष्टमीनंतर 'या' ३ राशींचे नशीब चमकणार! १७ ऑगस्टपासून सुरू होणार सुवर्णकाळ


मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. जन्माष्टमीनंतर १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेव मघा नक्षत्रात प्रवेश करतील. मघा नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. त्यामुळे सूर्यदेवाचं केतूच्या नक्षत्रात येणं काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं. या काळात त्यांच्या करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ लाभदायक ठरेल.


कर्क रास


सूर्यदेवाचं नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतं. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. वाहन आणि मालमत्तेशी संबंधित सुख मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात चांगली प्रगती होईल आणि नफा वाढेल. नोकरी आणि व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल. लांबच्या प्रवासातून फायदा होऊ शकतो.


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र गोचर लाभदायक सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्यांना या काळात बढती मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे आणि अडकलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील.


तूळ रास


तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याच मघा नक्षत्र गोचर खूप फायदेशीर ठरेल. या काळात नशिबाची साथ मिळेल आणि नशिबाच्या जोरावर कामात यश मिळेल. पराक्रम वाढेल आणि नात्यांमध्ये सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या स्त्रोतांकडूनही पैसा येईल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापाराचा विस्तार करण्याची संधी मिळेल.


Comments
Add Comment

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

तब्बल ४६ वर्षांनी एकत्र दिसणार कमल हासन आणि रजनीकांत

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हे दोघंही अनेक वर्षांपासून

पंतप्रधान १७ सप्टेंबरला सुरू करणार एक विशेष मोहीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी एका विशेष अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. हे अभियान संपूर्ण

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत