ट्रम्प यांचा चीनला घाबरून पुन्हा युटर्न! नवे टॅरिफ ९० दिवसांसाठी पुढे ढकलले 'या' कारणामुळे

प्रतिनिधी: अखेर चीन अमेरिका समझोता झाला आहे. टॅरिफ युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांनी पुर्णविराम देत चीनशी हातमिळवणी केली. तीन महिन्याच्या कालावधीसाठी अतिरिक्त टॅरिफ वाढवण्या ला अमेरिकेकडून स्थगिती दिली आहे.ट्रम्प यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सह्या करत हा निर्णय घेतला. त्यामुळे याचा मोठा परिणाम जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांवर होणार असून दोन्ही देशां च्या व्यापारावर यांचा परिणाम होणार आहे. अमेरिका व चीन यांनी मागील काही वर्षात आपापल्या उत्पादनांवर मोठा कर लादला होता. ट्रम्प यांनी जगातील इतर राष्ट्रांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेत ला ज्यामध्ये चीनवरही तीन अंकाने कर लावला. मात्र जागतिक तज्ञांच्या मते अमेरिकेला आपली चूक लक्षात आल्याने त्यांनी हा करार पुढे ढकलला आहे. चीनकडे असलेल्या दुर्मिळ खजिन्या च्या व धातूचा औद्योगिक वापरात मोठा वापर होतो. अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर १४५%, व अमेरिकेन वस्तूवर चीनने १२५% टॅरिफ लावल्याने खासकरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा नका रात्मक परिणाम होऊ लागला. तज्ञांच्या मते ही गोष्ट अमेरिकेच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला.

पुढील तीन महिन्यांसाठी हा करार स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विषयी बिजिंग व वॉशिंग्टन यांच्यात पुन्हा नव्याने करारावर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान प्रारंभिक बोलणी ला काही प्रमाणात यश आले आहे ज्यामध्ये त्यांनी करार पुढे ढकलला. याखेरीज डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मिडिया अकाऊंटवरून या निर्णयाची माहिती दिली आहे. यापूर्वी यशस्वी बोलणीत चीनने अमेरिकेच्या वस्तूवर १४५% वरून ३०%, व चीनने अमेरिकेच्या वस्तूवर १२५% वरून १०% वर आणला होता. मे महिन्यात जेनिवामध्ये झिगपिंग व ट्रम्प यांच्यात चर्चा झाली होती. ज्याचाच उत्तरार्ध म्हणून ही घोषणा ट्रम्प यांनी दिली आहे.

'आमच्यात सगळं काही नाईस (चांगले) आहे आमचे सगळे काही चांगले सुरु आहे संबंध चांगले आहेत' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी पत्रकारांना दिली आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनच्या व्यापारी संबं धावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्हाला चीनशी सौदा करताना मोठा तोटा होत आहे. आमची राष्ट्रीय वित्तीय तूट हा चिंतेचा विषय असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्यावर चीनने ही प्रश्न सोडवण्या ची ग्वाही युएसला दिली आहे.आगामी ९० दिवस चर्चेसाठी खुले आहेत जे काही मतभेद आहेत ते पुढील दिवसात सोडवण्यासाठी अधिक वेळाची आवश्यकता आहे असे युएस प्रशासनाकडून सांग ण्यात आले आहे. त्यामुळे नवी तारीख १० नोव्हेंबर नक्की करण्यात आली आहे.

मागील मुदत मंगळवारी पहाटे १२.०१ वाजता संपणार होती. जर तसे झाले असते, तर अमेरिका चिनी आयातीवरील कर आधीच असलेल्या ३०% वरून वाढवू शकली असती आणि बिजिंग अमेरि केच्या चीनला होणाऱ्या निर्यातीवर प्रत्युत्तरात्मक कर वाढवून प्रतिसाद देऊ शकला असता. मात्र हे प्रकरण नव्या निर्णयानंतर टळले आहे. यूएस-चीन बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष शॉन स्टीन म्हणा ले की, दोन्ही सरकारांना व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी वेळ देण्यासाठी ही मुदतवाढ "महत्वाची" आहे, ज्यामुळे अमेरिकन व्यवसायांना चीनमधील बाजारपेठेतील प्रवेश सोपा होईल आणि कंपन्यांना मध्यम आणि दीर्घकालीन योजना बनवण्यासाठी आवश्यक असलेली खात्री मिळेल अशी आशा आहे.

अमेरिकेतील शेती आणि ऊर्जा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी फेंटानिलवर करार करणे, ज्यामुळे अमेरिकेचे शुल्क कमी होईल आणि चीनचे प्रत्युत्तरात्मक उपाय मागे घेतले जातील असे स्टाइन पुढे म्हणाले आहेत. जूनमध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी एक करार केला. अमेरिकेने म्हटले की ते संगणक चिप तंत्रज्ञान आणि पेट्रोकेमिकल उत्पादनातील कच्चा माल इथेनवरील ची नवरील निर्यात निर्बंध मागे घेतील बदल्यात चीनने अमेरिकन कंपन्यांना दुर्मिळ पृथ्वीवर प्रवेश मिळवणे सोपे करण्यास सहमती दर्शविली आहे.'

अमेरिकेला हे समजले आहे की त्यांचा वरचष्मा नाही असे अर्नोल्ड अँड पोर्टर येथील वरिष्ठ वकील,चीन प्रकरणांसाठी माजी सहाय्यक यूएस व्यापार प्रतिनिधी क्लेअर रीड म्हणाल्या आहेत. त्यामुळे युएसने हे पाऊच उचलले असल्याची शक्यता आहे. मे महिन्यात, अमेरिका आणि चीनने एकमेकांच्या उत्पादनांवर लादलेले मोठे शुल्क कमी करून आर्थिक आपत्ती टाळली होती, जे चीन विरुद्ध १४५% आणि अमेरिकेविरुद्ध १२५% पर्यंत पोहोचले होते.
Comments
Add Comment

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार

नाशिकमध्ये कर्मभूमी एक्स्प्रेसमधून तिघे खाली पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नाशिक : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या आणि बिहारच्या रकसोलकडे जात असलेल्या कर्मभूमी

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना