शेअर बाजार उसळण्यास 'हे' कारण, जाणून घ्या सकाळचे विश्लेषण

  32

मोहित सोमण : सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. विशेषतः आयटी समभागात झालेल्या मोठ्या वाढीमुळे बाजार 'हिरव्या' रंगात सुरु झाला आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाली आहे. परिणामी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २९५.१८ अंकाने व निफ्टी ५० निर्देशांक ९६.४० अंकाने उसळला आहे. सकाळी शेअर बाजार उसण्यास कारणीभूत कारण म्हणजे काल उशीरा झालेली चीन युएस मधील समझोता करार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी नवी टॅरिफ आकारणी मागे घेतली आहे. १० नोव्हेंबरपर्यंत या बोलणीची सांगता अपेक्षित आहे. त्यामुळे विशेषतः चीन शेअर बाजार,आशियाई बाजारात काल वाढ झाली होती. आज सकाळच्या सत्रातही गिफ्ट निफ्टी वाढल्याने बाजारात आजही रॅलीचे संकेत मिळत आहेत. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६३.८५ अंकांनी व निफ्टी बँक निर्देशाकांत ६३.६५ अंकांनी घसरण झाली आहे.

यासह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यांमध्ये केवळ रिअल्टी (०.३९%) वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ आयटी (१.३१%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.२१%), तेल व गॅस (०.८०%),ऑटो (०.७९%) निर्देशांकात झाली आहे. आज सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ०.१६% घसरल्याने बाजारातील सकाळच्या सत्रात तरी स्थिरतेला गती आली आहे. आज विशेषतः आयटी शेअर्समध्ये वाढ युएस बाजारातील आयटी समभागातील रॅली मुळे झाल्याची शक्यता आहे. दरम्यान चीनमधील मिळणाऱ्या महसूलातील Nvidia व AMD कंपन्यांनी १५% वाटा युएस सरकारला देण्याचे ठरवल्यानंतर युएस बाजारात आश्वासक चित्र होते ते भारतीय बाजारपेठेतही कायम राहिले आहे. याशिवाय सकाळी बीएसई मिडकॅपमध्ये ०.२०% व स्मॉलकॅपमध्ये ०.४२% वाढ झाल्याने बाजारात तेजी मिळण्यास मदत झाली.

दुसरीकडे काल सोन्यासह कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही घसरण झाल्याने बाजाराला स्थिरता मिळाली असती तरी देखील विशेषतः खाजगी बँकेच्या कमजोर तिमाही निकालांचा फटका बँक निर्देशांकात बसला. अंतिमतः आज बँक निर्देशांकात घसरण झाली ज्यामुळे सकाळच्या सत्रातील रॅली मर्यादित झाली आहे. सकाळच्या सत्रात ब्लू चिप्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये समाधानकारक वाढ झाल्याने बाजारात सकारात्मकता दिसत आहे. याखेरीज आगामी काळात ट्रम्प पुतीन यांची बैठक व फेडचे गव्हर्नर बदलण्याची प्रक्रिया, सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेली युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात हे सध्या बाजारातील प्रमुख 'ट्रिगर' आहेत.

सकाळीच गिफ्ट निफ्टीसह (०.७२%), निकेयी २२५ (२.७२%), तैवान वेटेड (०.१४%), जकार्ता कंपोझिट (१.३२%), शांघाई कंपोझिट (०.५१%) या बाजारात वाढ झाली असून कोसपी (०.०१%), हेंगसेंग (०.१४%), स्ट्रेट टाईम्स (०.३६%) बाजारात घसरण झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एसवीजेएन (५.०३%), सोनाटा सॉफ्टवेअर (५.११%), हिताची एनर्जी (३.७९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.२१%), इंद्रप्रस्थ गॅस (२.६७%), वर्धमान टेक्सटाईल (२.५२%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.५२%), सम्मान कॅपिटल (२.५०%), लेमन ट्री हॉटेल (२.३६%), कोफोर्ज (२.२१%), एसबीएफसी फायनान्स (२.०४%), झेंसर टेक्नॉलॉजी (१.९५%), विप्रो (१.०८%), टेक महिंद्रा (१.७६%), टाटा स्टील (१.७६%), टायटन कंपनी (१.७६%), लाईफ इन्शुरन्स (१.७५%),टीसीएस (१.७३%), हिरो मोटोकॉर्प (१.६५%), अदानी टोटल गॅस (१.६४%), जेएम फायनांशियल (१.३२%), बीपीसीएल (१.२९%), वरूण बेवरेज (१.०१%), इन्फोसिस (०.८१%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण ॲसस्ट्रल (६.२३%), प्राज इंडस्ट्रीज (५.९३%), होम फर्स्ट फायनान्स (३.००%), फाटा इंडिया (१.५५%), मुथुट फायनान्स (१.६१%), कल्याण ज्वेलर्स (१.८८%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.४८%), भारत डायनामिक्स (१.४५%), सोलार इंडस्ट्रीज (१.३८%), ग्रासीम इंडस्ट्रीज (१.३७%), डिक्सन टेक्नॉलॉजी (०.८५%),बजाज फायनान्स (१.७९%), बीएसई (०.७१%),व्होल्टास (०.५८%),टाटा कम्युनिकेशन (०.५८%), ब्लू स्टार (०.५६%), होनसा कंज्यूमर (०.५४%), आदित्य बिर्ला कॅपिटल (०.४८%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (०.३२%), आयसीआयसीआय बँक (०.२२%), एचडीएफसी बँक (०.०३%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील सकाळच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ट्रम्प-पुतिन चर्चेच्या निकालावर बाजाराचे लक्ष असेल. जर या चर्चेतून यश आले आणि रशिया-युक्रेन युद्धाचा अंत झाला तर बाजाराच्या भावनांमध्ये नाट्यमय बदल होईल. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लादण्यात आलेले २५% दंडात्मक शुल्क अप्रासंगिक ठरेल. परंतु ट्रम्प यांचा अहंकार वाढला आहे आणि ते भारताच्या प्रतिसादावर नाराज आहेत, त्यामुळे परिस्थिती कशी पुढे जाईल हे आम्हाला माहित नाही. चीन-अमेरिका चर्चेला आणखी ९० दिवसांसाठी वाढवणे हे चर्चेतील चीनच्या लीव्हरेजचे प्रतिबिंब आहे, विशेषतः दुर्मिळ पृथ्वी चुंबक बाजारपेठेत चीनच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या लीव्हरेजचे.

जुलैमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये ४२७०२ कोटी रुपयांचा मजबूत इक्विटी फंड प्रवाह किरकोळ गुंतवणूकदारांचा आशावाद दर्शवितो. भू-राजकीय अडचणी असूनही ही प्रचंड तरलता बाजाराला आधार देऊ शकते. तथापि, व्यापक बाजारपेठेत, विशेषतः स्मॉलकॅप्समध्ये वाढलेल्या मूल्यांकनांपासून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. गुंतवणूकदारांनी वित्तीय, दूरसंचार आणि भांडवली वस्तूंमधील उच्च दर्जाच्या वाजवी मूल्याच्या वाढीच्या स्टॉकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मिडकॅप आयटी मूल्य खरेदीच्या संधी देते.'

आजच्या सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,'कालचा आशादायक वरचा चढउतार २४५९० पातळीच्या जवळ थांबला आहे हे दिवसाच्या सुरुवातीलाच मागे हटण्याची सूचना देणारी खबरदारी असल्याचे लक्षण आहे. तथापि, दैनिक ऑसिलेटर अनुकूल स्थितीत आहेत, ज्यामुळे २४६७०-७२०-८५० वर अनेक मध्यवर्ती आव्हाने असूनही, आम्हाला २५००० पातळीवर किंवा त्याहून अधिक शोधण्यास प्रोत्साहित केले जाते. पर्यायीरित्या, २४५९० पातळीच्या वर तरंगण्यास असमर्थता वरच्या गतीला कमी करेल, परंतु २४४५० ने मदत केली नाही तर आम्हाला २०० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) कडे धाव दिसणार नाही, जो आता २४०४९ पातळीवर आहे.'

सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सपाट ते सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे, असे गिफ्ट निफ्टीने दर्शविले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ५ अंकांची किरकोळ वाढ दर्शवते. सततच्या अस्थिरता आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत.

मागील सत्रात, निफ्टी सपाट उघडला परंतु मजबूत पुनर्प्राप्ती झाली, २३० अंकांपेक्षा जास्त वाढून तो मागील दिवसाच्या उच्चांकाजवळ बंद झाला. या किंमतीच्या कृतीने एक तेजीचा कॅन्डलस्टिक (Bullish Candle) पॅटर्न तयार केला, जो सतत खरेदीची आवड आणि वरची गती दर्शवितो. तांत्रिकदृष्ट्या,२४६५० पातळीवरील निर्णायक हालचाल २४८५० पातळीच्या दिशेने वाढीचे दार उघडू शकते, तर तात्काळ आधार २४५०० आणि २४३३० पातळीवर आहे दोन्ही नवीन दीर्घ पोझिशन्ससाठी आकर्षक झोन म्हणून पाहिले जातात.

बँक निफ्टीने देखील जवळजवळ ५८० अंकांची तीव्र इंट्राडे रिव्हर्सल पाहिली, ज्यामुळे एक मजबूत तेजीचा मेणबत्ती तयार झाला जो खालच्या पातळीवर सतत खरेदी करत असल्याचे प्रतिबिंबित करतो. २० आठवड्यांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अँव्हरेज (Exponential Moving Average EMA) च्या जवळ त्याला मजबूत आधार मिळाला, ज्याचे प्रमुख आधार आता ५५३२० आणि ५५००० पातळीवर आहेत. ५५७००-५६००० पातळीच्या श्रेणीत प्रतिकार दिसून येत आहे आणि या क्षेत्राच्या वर एक खात्रीशीर ब्रेकआउटमुळे मानसिक ५६२०० पातळीच्या दिशेने वाढ होऊ शकते.

संस्थात्मक आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ११ ऑगस्ट रोजी १२०० कोटींपेक्षा थोडे जास्त किमतीचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ५९७२ कोटींचे निव्वळ खरेदीदार होते.सध्याच्या अनिश्चिततेचे आणि वाढत्या अस्थिरतेच्या वातावरणामुळे, व्यापाऱ्यांना विशेषतः लीव्हरेज्ड पोझिशन्स हाताळताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. रॅलीजवर आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस वापरणे - जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी विवेकी धोरणे आहेत. निफ्टी २४७५० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. एकूणच, बाजाराचा दृष्टिकोन सावधगिरीने तेजीत राहतो, प्रमुख ब्रेकआउट पातळी आणि जागतिक घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करण्याची शिफारस केली जाते.'

यामुळे आजच्या बाजारातील मिडकॅप व स्मॉलकॅप मधील वाढ कायम राहिल्यास किरकोळ गुंतवणूकदारांना त्याचा फायदा अपेक्षित आहे. तसेच ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह निफ्टी क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील रॅली बाजारातील उसळीची मर्यादा निश्चित करू शकतात.
Comments
Add Comment

Justice Yashwant Varma Case : मोठी बातमी! न्यायमूर्ती यशवंत वर्मा संकटात! महाभियोग प्रस्तावाला लोकसभेची मंजुरी, तपास समिती सक्रिय

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील वादग्रस्त रोख रक्कम प्रकरणात

तुरुंगातून बाहेर येताच सय्यदला तिनं हार घातला आणि रात्री सय्यदनेच तिच्यावर गोळीबार केला

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. हर्सूल तुरुंगातून बाहेर आलेल्या सय्यद

Mumbai Crime news : मुंबईच्या काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ६ अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरातून हादरा बसणारी घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर

मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने केला घात, महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमुळे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचा मृत्यू

Police Bharti Maharashtra 2025 : ठरलं तर मग, महाराष्ट्रात जम्बो पोलिस भरतीचं बिगुल! १५ हजार पदांसाठी आजच हिरवा कंदील

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपण्याच्या

मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात