प्रसार भारती आणि एईएक्स स्पोर्ट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

मुंबई: भारताच्या क्रीडा मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन घडविणारे एक महत्त्वाचे पाऊल उचलत राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक- प्रसार भारतीने एईएक्स स्पोर्ट (AEx SPORT) या युके स्थित आदिग्रुपच्या स्पोर्ट्स इनोव्हेशन शाखेसोबत ग्लोबल लीग रेसलिंग (GLW)च्या प्रसारणासाठी एक धोरणात्मक सामंजस्य करार (Memorandum of Understanding MoU) केला आहे. जीएलडब्ल्यू हा भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात होणारा या प्रकारचा पहिला व्यावसायिक रेसलिंग लीग आहे. या अनोख्या सहयोगामुळे भारत आणि आशिया-पॅसिफिक तसेच जागतिक प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाच्या क्रीडा मनोरंजनाची निर्मिती करण्यासाठी प्रसार भारतीची टेलिव्हिजन, रेडियो आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असलेली व्यापक राष्ट्रीय पोहोच आणि एईएक्स स्पोर्ट चे जागतिक ब्रँडिंग, कंटेंट, निर्मिती, आयपी आणि मार्केटिंगचे नैपुण्य यांचा सुमेळ साधला आहे.

१७ सप्टेंबर २०२५ रोजी जीएलडब्ल्यूची अधिकृत सुरुवात होणार असून त्याच्या प्रसारणाची सुरुवात ४ ऑक्टोबर २०२५ रोजी होईल. क्रीडा आणि तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार निरंतर करत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. जीएलड ब्ल्यूचे प्रसारण डीडी स्पोर्ट्सवरून करण्यात येईल तसेच प्रसार भारतीचा डिजिटल प्लॅटफॉर्म वेव्ह्ज आणि एअरवर त्याचे स्ट्रीमिंग होईल. जीएलडब्ल्यू चा हा कुटुंबांना गुंतवून ठेवणारा पहिला सीझन ४० आठवडे चालणार आहे.

या करारावर बोलताना प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल म्हणाले आहेत की,'भारतीय प्रो-रेसलिंगसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. भारतीय खेळांना जागतिक दर्जाचे बनवण्याचा उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हॉकी इंडिया, हँ डबॉल असोसिएशन ऑफ इंडिया, पीजीटीआय आणि इतरांसोबत असलेली आमची भागीदारी आणखी पुढे नेत ही भागीदारी विविध खेळांना प्रोत्साहन देण्याची आमची वचनबद्धता मजबूत करते. आणि ही भागीदारी भारताच्या पुढच्या पिढीच्या तरुणांना आणि खे ळाडूंना एक राष्ट्रीय मंच प्रदान करेल.'

या भागीदारी विषयी बोलताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले आहेत की,'ही भागीदारी भारतीय प्रेक्षकांना आकर्षक, सांस्कृतिकदृष्ट्या संबद्ध आणि दर्जेदार कंटेंट प्रदान करण्याची प्रसार भारतीची निरंतर वचनबद्धता अधोरेखित करते. जीए लडब्ल्यू तरुणांचे नेतृत्व असलेले कार्यक्रम वेगळ्या शैलीत प्रस्तुत करतो. त्यामध्ये भारताच्या परंपरेला आंतरराष्ट्रीय क्रीडा मनोरंजन मानकांची जोड मिळते.'

उपक्रमाविषयी बोलताना आदिग्रुप आणि एईएक्स स्पोर्टचे अध्यक्ष संजय विश्वनाथन म्हणाले आहेत की,' जीएलडब्ल्यू हा जगभरातील क्रीडा रसिकांना एक वेधक आणि समावेशक क्रीडा-आधारित सांस्कृतिक अनुभव प्रदान करण्याच्या एईएक्स स्पोर्ट च्या व्यापक मिशनचा एक भाग आहे. १७ सप्टेंबर रोजी आम्ही जीएलडब्ल्यू भारताला समर्पित करत आहोत. ज्यामुळे स्पर्धात्मकता आणि क्रीडा मनोरंजनात उत्कृष्टता यांच्या माध्यमातून भारतीय तरुणांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढेल आणि भारतीय प्रो-रेसलिं ग क्षेत्रातील प्रतिभांना जागतिक मंचावर झळकण्याची संधी मिळेल.'

जीएलडब्ल्यूचे आकर्षण वाढवण्यासाठी माजी डब्ल्यूडब्ल्यूई वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन आणि जागतिक स्तरावर गाजलेला भारतीय अँथ्लीट द ग्रेट खली याची ब्रॅंड अम्बॅसडर आणि टॅलेंट कमिश्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या दुहेरी भूमिकेत तो प्रतिभेची नि वड, मार्गदर्शन आणि कंटेंट विकासात महत्त्वाचे योगदान देईल. द ग्रेट खली म्हणतो, 'रेसलिंगने माझे आयुष्य पालटून टाकले आणि मला जागतिक मंच मिळवून दिला. पुढच्या पिढीच्या भारतीय खेळाडूंना त्याच मार्गावर चालण्यासाठी जीएलडब्ल्यू एक गंभीर, सं घटित आणि मनोरंजक संधी देईल आणि त्यांना भारतीय आणि जागतिक मंचावर आपल्या शर्तींवर झळकण्याची संधी मिळेल.'
Comments
Add Comment

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे