Mumbai Crime news : मुंबईच्या काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ६ अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरातून हादरा बसणारी घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घडली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरु होते. ६ आरोपी अनेक दिवस या मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्या शरीराला घाणेरडा स्पर्श करत होते. एक धक्कादायक बाब अशी की, या मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape News) करणारे पाचही आरोपी हे अल्पवयीन आहेत. ही घटना समोर आल्यानंतर काळाचौकी परिसरात संबंधित आरोपींच्याविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला एका आरोपीने या मुलीचा एक अश्लील व्हिडीओ चित्रीत केला. हा व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला वारंवार ब्लॅकमेल केले जात होते आणि तिच्यावर आरोपींकडून लैंगिक अत्याचार केले जात होते. मात्र, एका आरोपीच्या प्रेयसीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.



पीडित मुलीवर ही पाच अल्पवयीन असणारी मुले आळीपाळीने या मुलीचा शारीरिक उपभोग घ्यायची. यापैकी एका आरोपीच्या प्रेयसीला आपल्या प्रियकराचे आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. त्यामुळे तिने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आईकडे तक्रार केली. यानंतर पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी मुलीचे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. पीडित मुलीला आईने याबाबत अधिक खोलवर जाऊन विचारल्यावर या मुलीने पाच जणांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे तिने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पाचही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींचे मोबाइलही जप्त केले आहेत. हे मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता त्यामधून काय माहिती येणार, हे पाहावं लागेल. दरम्यान, पाचही आरोपींची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.



नेमकं काय घडलं?


आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांना खूप चांगलं ओळखत होते. पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. गेल्यावर्षी १ ऑक्टोबर रोजी १७ वर्षांच्या आरोपीने या मुलीसोबत शारीरिक जवळीक साधली होती. त्याने तिला अटक करण्यात आलेल्या २७ वर्षीय आरोपीच्या घरी नेले. तेथे आरोपींनी या मुलीवर बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ आरोपींनी इतर काहीजणांना दिला. हा व्हिडीओ दाखवून इतर चार आरोपींनी मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर अत्याचार केले. अल्पवयीन आरोपी १६ ते १७ वयोगटातील आहेत. त्यातील एक आरोपी २७ वर्षांचा असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या