मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सुरूवातीच्या कलात वाढ झाली असली तरी ती अखेरच्या सत्रात कायम राहिल का किरकोळ घसरण अथवा सपाट (Flat) पातळीवर बाजार बंद होईल का हा खरा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे. सकाळी बाजा र उघडल्यावर सेन्सेक्स केवळ २ अंकाने व निफ्टी ९.९० अंकांने उसळला आहे. प्रामुख्याने जगातील युएसकडून टेरिफची होणारी दिवसेंदिवस वाढ व अस्थिरता यांचा फटका आजही भारतीय बाजारात बसणे अपेक्षित आहे. कारण सकाळच्या सत्रात अस्थिरता नि र्दे शांक (VIX Volatility Index) पातळी ३.९६% उसळल्याने आज दुपारपर्यंत सारखाच कल राहिल का याची शाश्वती नाही. दुसरीकडे युएस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना शुक्रवारी अलास्का येथे भेटणार आहेत. याशिवाय १२ ऑगस्टला यु एस चीन टेरिफ करारावर अंतिम चर्चा अपेक्षित आहे. यामुळे आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांत औत्सुक्याचे वातावरण असल्याने आशियाई बाजारात आज सकाळच्या कलातही मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सेन्सेक्स बँक निर्देशांक २६२.५५ अंकाने व बँक निफ्टी १४४ अंकाने वाढला आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.०१% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.०७% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.१०% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.०३% घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय नि र्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये बहुतांश निर्देशांकात वाढ झाली असली तरी काही निर्देशांक घसरणीही झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल (०.५२%), पीएसयु बँक (१.४४%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.२९%), रिअल्टी (०.५ ३%) निर्देशांकात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण कंज्यूमर ड्युरेबल्स (१.८६%), आयटी (०.३५%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
भारतीय बाजारातबाबत बोलल्यास आज मात्र अखेरपर्यंत गुंतवणूकदारांना निराशा पदरी येण्याची शक्यता अधिक आहे. केवळ मिड व स्मॉलकॅप नाही तर निफ्टी क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील विशेष कामगिरी आधारित कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रभाव पडणे अपेक्षि त आहे. तसेच तिमाही निकालांचा फायदा अथवा फटका या क्षेत्रीय निर्देशांकात बसणे अपेक्षित आहे. भारत सरकारने टेरिफवाढीमुळे नक्की भारतावर कायम परिणाम होईल ही निश्चिती केली असून यावर अहवाल कॅबिनेट मंत्रीमंडळ संसदेला सादर करून यावर आपले म्हणणे मांडणार आहे.
आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात सकाळी ९.२० वाजेपर्यंत गिफ्ट निफ्टीसह (०.२९%), निकेयी २२५ (१.८२%), तैवान वेटेड (०.७५%), कोसपी (०.१३%), जकार्ता कंपोझिट (०.५६%), शांघाई कंपोझिट (०.५१%) बाजारात वाढ झाली असून केवळ स्ट्रेट टाईम्स (०.०९%), हेंगसेंग (०.०१%) बाजारात किरकोळ घसरण झाली. शनिवारपर्यंत युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.२२%),एस अँड पी ५०० (०.७८%), नासडाक (०.९८%) या तिन्ही बाजारात वाढ झाली होती. अमेरिकेतील बहुतांश आयटी समभगात वाढ झा ल्याने तसेच विशेषतः Nvidia, AMD कंपन्यांनी चीनमधील चिप्स विकून मिळणाऱ्या महसूलातील १५% वाटा युएस सरकारला देणार आहे ज्यामुळे बाजारातील भावना उंचावल्या गेल्या. याशिवाय ट्रम्प आता युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल हे आगामी काळात नवे गव्हर्नर नियुक्त करू शकतात ज्यामुळे गुंतवणूकदारांना नवे गव्हर्नर आल्यास युएस फेडरल दरात कपात होण्याची संभावना वाटते.
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचबीएल इंजिनिअरिंग (११.१३%), डोम्स इंडस्ट्रीज (४.५५%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.४९%), लेमन ट्री हॉटेल (३.२२%),नेटवेब टेक्नॉलॉजी (२.३६%), इंडियन बँक (२.०७%), आनंद राठी वेल्थ (२.२८%), एसबीआय (१.६५ %), जेएसडब्लू एनर्जी (१.५६%), बँक ऑफ बडोदा (१.०४%), माझगाव डॉक (१.२२%) ओला इलेक्ट्रिक (०.८५%) समभागात झाली. \
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (९.९९%), अंबर एंटरप्राईजेस (६.४२%), व्होल्टास (५.५७%), लिंडे इंडिया (४.०१%), सिमेन्स इंडिया (३.२३%), ब्लू स्टार (३.०९%), भारती हेक्साकॉम (१.९७%), हवेल्स इंडिया (१.७८%), टायटन कंपनी (१.०३%), कजारिया सिरॅमिक्स (१.१८%), आलोक इंडस्ट्रीज (१.१६%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील सुरुवातीच्या स्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' या आठवड्यात इतर घटकांपेक्षा भूराजकीय घडामोडी बाजाराच्या ट्रेंडवर जास्त प रिणाम करतील. अलास्का येथे ट्रम्प-पुतिन चर्चेच्या निकालावर बाजाराचे लक्ष असेल. जर या चर्चेमुळे रशिया-युक्रेन युद्ध संपले तर ते एक मोठे सकारात्मक घडामोडी ठरेल. रशियावरील अमेरिकेचे निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात आणि परिणामी रशियाकडून ते ल खरेदी करण्यासाठी भारतावर लादलेल्या २५% दंडात्मक शुल्काचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. जर असे झाले तर ओव्हरसोल्ड बाजार एक स्मार्ट रिबाउंड करेल. गुंतवणूकदारांना घडामोडीं साठी वाट पहावी लागेल. गेल्या सहा आठवड्यात भारत इतर बाजा रपेठांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी कामगिरी करत आहे. सप्टेंबर २०२४ च्या विक्रमी उच्चांकापेक्षा निफ्टी ७.६% खाली आहे. सकारात्मक बातम्यांमुळे तीव्र शॉर्ट-कव्हरिंग रॅली येऊ शकते, तरीही कायमस्वरूपी रॅली केवळ कमाईच्या आघाडीवर मूलभूत आधार देईल. हे तिसऱ्या तिमाहीपासून होऊ शकते. आता, सुरक्षितता बऱ्यापैकी मूल्यवान लार्जकॅप्समध्ये आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,' २०० दिवसांचा एसएमए (Simple Moving Average SMA) जो आता २४०४९ पातळीवर आहे, तो निफ्टीला स्पष्ट पणे खाली खेचत आहे, २३७२२ खाली फिबो सपोर्ट देत आहे. तथापि, २४४३३/४७५ वरील थेट वाढ शॉर्ट कव्हरिंगला कारणीभूत ठरू शकते, सुरुवातीला २४६७० चे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही बाजूंच्या सीमा, अशा प्रकारे सेट केल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे की दिशात्मक हालचालींसाठी पुरेसा वेग नाही. आठवड्याची सुरुवात आपण सकारात्मक ऑसिलेटर डायव्हर्जन्सकडे लक्ष देऊन करू जे आठवडा पुढे जात असताना वाढीच्या शक्यता दर्शवितात.'
यामुळे आज अस्थिरतेसह गुंतवणूकदारांना स्मॉलकॅप शेअर्समधील होत असलेल्या नुकसानाला सामोरे जाऊ लागू शकते. दरम्यान क्षेत्रीय विशेष निर्देशांकांचा प्रभाव विशिष्ट कंपनीच्या समभागावर कायम राहू शकतो तसेच दुपारपर्यंत टेरिफविषयी काही नवी घडा मोड समोर आल्यास त्याचाही परिणाम अपेक्षित आहे.