बेस्टच्या पतपेढीची निवडणूक यंदा गाजणार

  28

ठाकरेंच्या पॅनलला राणे, दरेकर, लाड, पावसकर यांचे आव्हान


मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा राजकारण रंगणार आहे. आधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत एक पॅनल तयार केलेले असताना आता ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी महायुतीनेही मोर्चेबांधणी केली आहे. आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंत्री नितेश राणे आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी एकत्र येऊन एक पॅनल तयार केले आहे. त्यामुळे यंदा ही निवडणूक चुरशीची होणार आहे.


मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्व पातळ्यांवर या राजकारणातील युती आणि आघाड्यांना सुरुवात झाली आहे. त्याचाच प्रत्यय बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीतही येऊ लागला आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.


या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. बेस्टचे बहुतांश कामगार, पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. कित्येक कर्मचारी हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत.


शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असून दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच उत्कर्ष पॅनेल या निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहे.


महायुतीच्या नेत्यांना आणखी दोन संघटनांची साथ
महायुतीमधील या नेत्यांच्या तीन संघटनांना बेस्टमधील आणखी दोन संघटनांनी साथ दिली आहे. त्यात महेंद्र साळवे यांची बेस्ट एसी/एसटी/व्हीजेएनटी वेल्फेअर असोसिएशन व दिवंगत मनोज संसारे यांचा बहुजन संघ अशा दोन संघटनांचाही महायुतीच्या पॅनेलमध्ये
समावेश आहे.

भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेक सभासदांचे राजीनामे
सुमारे ८४ वर्षांचा इतिहास असलेल्या या पतसंस्थेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संचालक मंडळ गेली ९ वर्षे कार्यरत होते. या काळात या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेक सभासदांनी सोसायटीचे राजीनामे दिले. परिणामी यांच्या कार्यकाळात सोसायटीच्या सभासदांची संख्या निम्म्यावर आली. ‘अ’ श्रेणीमध्ये असलेली सोसायटीची श्रेणी घसरून गेली ४ वर्षे ‘ब’ श्रेणीमध्ये आलेली आहे असा आरोप पवार यांनी केला आहे.
Comments
Add Comment

मनसेच्या संदीप देशपाडेंनी उडविली गुजराती भाषिकांची खिल्ली

‘कबुतरखाना’वरून गुजराती भाषिक, जैन विरुद्ध स्थानिक मराठी वादाची झालर मुंबई : मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली

मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये यशस्वीरीत्या उभारला स्टील स्पॅन

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि