प्रतिनिधी:अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस (Adani Defence and Aerospace Limited ADSTL) कडून इंडामेर एरो सर्विसेस (Indamer Aero Services Limited) कंपनीचे १००% अधिग्रह ण (Acquisition) होणार आहे. अदानी डिफेन्सने आपले वेंचर असलेल्या हॉरीझॉन एरो सोल्यूशन (Horizon Aero Solutions) माध्यमातून प्राईम एरो सर्विसेस एलएलपीशी डेफीनेटिव करार केला आहे. हॉरीझॉन हे अदानी व प्रजय पटेल यांची प्राईम एरो (Prime Aero) यांची भागीदारी आहे. त्यामुळे हे वेंचर आता इंडामेर टेक्निक्स कंपनीचे अधिग्रहण करणार आहेत. आपल्या रेग्युलेट री फायलिंगमधील ही माहिती अदानी डिफेन्स कंपनीने एक्सचेंजला दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिताना,'अदानी एंटरप्राईजेसचा यामाध्यमातून विस्तार होणार आहे. व एव्हिऐशन मेंटेनन्स, रिपेअ र,ओव्हरहॉल या क्षेत्रात आम्ही नव्याने विस्तारत आहोत.' असे म्हटले आहे. उपलब्ध माहितीनुसार या कराराला डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिऐशन (DGCA), युएस फेडरल एव्हिऐशन अँडमिनिस्ट्रेशन (FAA) व इतर नियामक मंडळाने या कराराला परवानगी दिली आहे असे कंपनीने नमूद केले आहे. त्यामुळे या अधिग्रहणाचा अधिकृत मार्ग मोकळा झाला आहे. आयटीपीएल कंपनी नागपूर स्थित असून ३० एकर परिसरात पसरली आहे. कंपनीची १५ एअरक्राफ्ट राखून ठेवण्याची क्षमता आहे. ही ३० एकर जागा संपूर्णपणे ग्रीनफिल्ड आहे.
या अधिग्रहणा विषयी बोलताना अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी म्हणाले आहेत की,'भारताला एक प्रमुख जागतिक एमआरओ डेस्टिनेशन म्हणून स्थापित करण्याच्या आमच्या प्रयत्नातील हे अ धिग्रहण पुढचे पाऊल आहे. हे भारतातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांना बळकटी देणारी एकात्मिक विमान वाहतूक सेवा परिसंस्था तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला देखील बळकटी देते. आमचे ध्येय जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांवर आणि ग्राहकांच्या समाधानावर आधारित एकल-बिंदू विमान वाहतूक सेवा प्लॅटफॉर्म तयार करणे आहे.'
याशिवाय अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी म्हणाले आहेत की,'आमच्या पोर्टफोलिओमध्ये एअर वर्क्सचा समावेश झाल्यानंतर, हे संपादन एमआरओ विभागात आ मच्या क्षमता आणि पाऊलखुणा आणखी मजबूत करते आणि देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील एमआरओ खेळाडू म्हणून आमचे स्थान मजबूत करते.'
इंडामर टेक्निक्स आणि प्राइम एरोचे संचालक प्रजय पटेल म्हणाले आहेत की,' हे सहकार्य मजबूत पायाभूत सुविधा आणि वाढीच्या भांडवलासह खोलवर रुजलेली अभियांत्रिकी उत्कृष्टता ए कत्र आणते.'