'ती' दोन माणसे कोण?, राहुल गांधींनी नाव जाहीर करावी, शरद पवारांच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुंबई:  निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण आहेत, त्यांची नावे राहुल गांधी यांनी जाहीर करावीत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी दोन मंडळी आपल्याला भेटल्या होत्या. त्यांना राहुल गांधी यांच्या समोर नेले. परंतु, राहुल गांधी यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा दावा ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी शनिवारी नागपूर येथे केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, 'किती खोटं बोलावे याला मर्यादा असते. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडे कोण येतो कोण जाते याची नोंद असायला हवी. शरद पवार ज्या दोघांना घेऊन गेले, याची नोंद राहुल गांधीच्या घरी नक्कीच असणार. त्यामुळे शरद पवारांसोबत दोन माणसं कोण होती? त्यांची नावे जाहीर करावीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.



‘मंडल यात्रे’वर केली टीका


प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल यात्रे’वर देखील सडकून टीका केली आहे. या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण करणे नाही, तर यामागे राजकीय हेतू आहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे,” असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण