कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने भाविकांसाठी दर्शन बंद राहणार आहे. दोन दिवसाच्या कालावधीत भाविकांना देवीच्या उत्सवमूर्ती व श्रीकलशाचे दर्शन घेता येईल. यानंतर म्हणजेच बुधवार १३ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे.

देवी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सोमवार ११ आणि मंगळवार १२ ऑगस्ट रोजी कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन बंद असेल. या कालावधीत भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन बुधवार १३ ऑगस्ट २०२५ पासून पुन्हा सुरू होणार आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून परवानगी घेतल्यानंतरच देवी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला आहे. मूर्ती दीर्घकाळ सुस्थितीत ठेवण्याच्या उद्देशानेच संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे.मूर्ती संवर्धनासाठी गाभाऱ्यामध्ये फक्त तज्ज्ञांनाच प्रवेश दिला जाईल. श्रावणी सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता