IND vs ENG: करुण नायरने केले शुभमन गिलच्या नेतृत्वाचे कौतुक


नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या कसोटी मालिकेत धीराने नेतृत्व केल्याबद्दल भारतीय फलंदाज करुण नायरने नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत करुण आठ वर्षांनी भारतीय संघात परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी स्वरूपातून निवृत्त झाल्यामुळे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या संघ-प्रथम धोरणामुळे भारत या मालिकेत बदलाच्या टप्प्यातून गेला होता.


करुणने इंग्लंड दौऱ्यापूर्वी २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला पुन्हा भारतीय संघात सामील होण्याची संधी मिळाली होती. भारत आणि इंग्लंडमधील ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. करुणने गिलच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या सातत्याचे श्रेय नव्या कर्णधाराला दिले आहे.


करुण म्हणाला, 'शुभमनने सर्वांना एकत्र ठेवण्याची पद्धत आणि त्याने दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद होते. सुरुवातीपासूनच त्याचा संवाद अगदी स्पष्ट होता. फलंदाज म्हणून त्याने जे काही साध्य केले आणि एक नेता म्हणून संघाचे नेतृत्व केले.' पदार्पणाच्या कसोटी कर्णधार म्हणून गिलसाठी ही मालिका चांगली होती. भारताने पाचवा कसोटी सामना रोमांचक पद्धतीने जिंकला.ज्यामुळे मालिका बरोबरीत राखता आली.


इतकेच नाही तर गिलने फलंदाजीनेही शानदार कामगिरी केली आणि ७५४ धावा करून मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने एजबॅस्टन येथे द्विशतक आणि शतकही झळकावले.


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत करुण नायर पहिल्या चार सामन्यांमध्ये आपल्या शानदार सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. पण ओव्हल कसोटीत त्याने पहिल्या डावात ५७ धावांची महत्त्वाची खेळी खेळून प्रभाव पाडला. भारताच्या मालिका बरोबरीत आणणाऱ्या विजयात ही खेळी महत्त्वाची ठरली होती.


Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित