संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात


चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला पत्र लिहून, मला रिलीज करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अजूनही सात ते आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण या स्पर्धेआधी होणाऱ्या लिलावाआधी ट्रेडिंग विंडो खुली आहे. त्यामुळे एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघात आणि दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या संघात घेण्याचा पर्याय फ्रेंचायझींसमोर उपलब्ध आहे. राजस्थान रॉयल आपल्या कर्णधाराला सोडण्यास इच्छुक नव्हते, पण संजूनेच ही विनंती केल्यानंतर ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


संजूप्रमाणेच आर. अश्विनही चेन्नई सुपर किंगची साथ सोडण्याच्या तयारीत दिसत आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा आर अश्विन गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून आला होता. त्याला गेल्या हंगामात १४ पैकी ९ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आर अश्विन चेन्नई सुपर किंग्ज संघाची साथ सोडणार आहे. याबाबत त्याने फ्रेंचायझीला कळवल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र अश्विन या संघाची साथ का सोडत आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघ आर अश्विनला दुसऱ्या संघासोबत ट्रेड करणार की त्याला लिलावात पाठवणार हे देखील स्पष्ट झालेलं नाही.


आर अश्विनने याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. तो केवळ फ्रेंचायझी क्रिकेट खेळताना दिसून येत होता. काही दिवसांपूर्वी तो तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा खेळताना दिसून आला होता. गेल्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना त्याने ९ सामन्यांमध्ये ७ गडी बाद केले होते. या हंगामात अश्विनला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.


संजू सॅमसन चेन्नईकडून खेळणार?


संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. त्याला या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याने या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचे संघमालक आणि राहुल द्रविड याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघासाठी फलंदाजी करताना सर्वाधिक ३९३४ धावा केल्या आहेत. आता चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं
ठरणार आहे.

Comments
Add Comment

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी

स्मृती मानधना लवकरच 'इंदूरची सून' होणार! प्रियकर पलाश मुच्छलने भर कार्यक्रमात दिली लग्नाची कबुली

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन-डे सामना आज पर्थमध्ये रंगणार

कॅनबेरा : - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. सर्वांचे

दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार

नवी दिल्ली : महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला

आयपीएलचा लिलाव पुन्हा परदेशात?

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा परदेशात होणार आहे. २०२६ च्या हंगामासाठीचा हा लघु-लिलाव १५ ते १८ डिसेंबर

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने