टॅरिफमुळे अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा करार अडचणीत
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात जगातील बऱ्याच देशांवर आवाजावी कर लादला आहे. ज्यामुळे अनेक देश त्यांच्यावर नाराज आहे. ज्यात भारताचा देखील समावेश आहे. मात्र आता या करामुळेचा अमेरिका स्वतःच अडचणी सापडण्याची शक्यता आहे. टॅरिफमुळे F-35 लढाऊ विमान बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टिन आर्थिक संकटात सापडली आहे. कारण स्पेनने F-35 लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला आहे. तसेच स्वित्झर्लंड देखील F-35 खरेदी करण्यास नकार देण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर भारतानेही अमेरिकन शस्त्रे खरेदी करणे बंद केले आहे. ज्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांची अडचण वाढली आहे.
स्पेनचा घेतला अमेरिकेपासून दूर राहण्याचा निर्णय
स्पेनने F-35 लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला असून्, त्याबदल्यात युरोपियन जेट युरोफायटर टायफून आणि फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टम (FCAS) खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, आमचे लक्ष आता एअरबस, BAE सिस्टम्स आणि लिओनार्डो सारख्या युरोपियन कंपन्यांवर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यावर नाटो खर्च ५ टक्के वाढवण्यासाठी दबाव टाकला होता. तसेच ट्रम्प यांनी स्पेनला टॅरिफची धमकीही दिली होती, त्यामुळे आता स्पेनने अमेरिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वित्झर्लंड देखील नाराज
अमेरिकेने स्वित्झर्लंडवर ३९ टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे या देशातील नेत्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. खासदार बाल्थासर ग्लॅटली यांनी, जो देश आपल्यावर दगडफेक करतो, त्याला आपण भेटवस्तू नाही देऊ शकत. असे विधान केले. त्यानंतर त्यांनी एफ-35 लढाऊ विमान करार रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
भारताची भूमिका काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. आता भारताने तेजस आणि इतर पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. भारत अमेरिकेपासून दूर राहिला तर रशियन एसयू-57 लढाऊ विमान खरेदीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या तिन्ही प्रमुख देशांच्या निर्णयांमुळे अनेरिकेला फटका बसण्याची शक्यता आहे.