महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण


नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील १७ सरपंचांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय. यात पुणे आणि सोलापूरच्या दोन सरपंचांचा समावेश आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना हा मान मिळालाय.



स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना निमंत्रण दिलं जातं. यंदा महाराष्ट्रातील १७ सरपंचांना त्यांच्या पत्नींसह हा मान मिळालाय. यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद ऊर्फ संतोष लोंढे यांचा समावेश आहे.


संदीप ढेरंगे यांनी कोरेगाव भीमाला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वनजमीन आणि सरकारी निधी मिळवला. विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली.



सोलापूरच्या लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद लोंढे २०१० पासून गावाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी गावाला स्वच्छ आणि २४ तास पाणीपुरवठा मिळावा यासाठी सौरऊर्जेवर आधारित पाणी योजना राबवली. सौर वॉटर हिटर बसवून ग्रामस्थांना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गावात ५ हजार झाडं लावून लोंढेवाडीला पर्यटन केंद्र म्हणून विकसित केलं. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कामामुळे त्यांना दिल्लीच्या सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय. प्रमोद लोंढे यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लोंढेवाडी आज एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय. त्यांच्या या कामगिरीचा गौरव आता लाल किल्ल्यावर होणार आहे.


अशाप्रकारे महाराष्ट्रातील एक दोन नव्हे तर तब्बल १७ सरपंचांनी आपल्या गावांच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा गौरव दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार आहे. हा सोहळा केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नाही, तर गावागावांत बदल घडवणाऱ्या या नेत्यांचा सन्मान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Comments
Add Comment

शाळेची बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू आणि अनेक जखमी

नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

एसटीने गणपतीला कमावले आणि दिवाळीत गमावले! कारण काय?

एसटीला ऑक्टोबरमध्ये १८० कोटींचा फटका तिकीट महसुलात सरासरी ६ कोटींची दैनंदिन तूट मुंबई : दिवाळीसारख्या

प्रचार करणार कधी? इच्छूक उमेदवार संभ्रमात!

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच,

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.