अखेर रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर जनतेला दिलासा सोने सहा दिवसानंतर स्वस्त! 'हा' सुरु आहे दर

प्रतिनिधी: रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. अखेर सहा दिवसानंतर सोने स्वस्त झाले आहे. सातत्याने सोन्याच्या निर्देशांकात जगात घसरण असताना सोन्याती ल गुंतवणूकीसाठी सामान्यांचे कंबरडे मोडले होते. अशातच कालपर्यंत सातत्याने सोने वाढत होते आज त्या वाढीची सांगता झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅ रेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात आज २७ रूपयांनी घसरण झाली. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २५ व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २१ रूपयांनी घसरण झाली. ज्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०३०४ रूपये, २२ कॅरेटसाठी ९४४५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७७२८ रूपयांवर सुरु आहे.


माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २७० रूपयांनी, २२ कॅरेट तोळा दरात २५० रुपयांनी व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २१० रूपयांनी घसरण झाली ज्यामुळे प्रति तोळा किंमत अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०३०४० रूपये, २२ कॅरेटसाठी ९४४५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७७२७० रूपये झाली आहे.


संकेतस्थळावरील माहितीनुसार,मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०३०४ रूपये, २२ कॅरेटसाठी ९४४५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७७२८ रूपये आ हे. जागतिक सोन्याच्या निर्देशांकात आज दिवसभरात घसरण झाली होती. टेरिफचा दबाव जगभरात कायम असताना सोन्याच्या गुंतवणूकीत कालपर्यंत मोठी वाढ झाली होती. आज त्यात किंचित घसरण झाली असल्याकारणाने ही घसरण झाली. याशिवाय सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीसह स्पॉट मागणीत घसरण झाल्याने भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली. आज पहाटेपर्यंत स काळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली असली तरी उत्तरार्धात मात्र घसरण झाली.


संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकातील मात्र संध्याकाळपर्यंत १.०९% वाढ झाली आहे. प्रामुख्याने भारतातील सोन्याची घसरण ही वाढलेल्या रूपयामुळेही झाली. डॉलर च्या तुलनेत रुपया वधारला त्यामुळे ही घसरण अपेक्षित होती. आज भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांक ०.०३% वाढला होता. तर युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याका ळपर्यंत ०.०४% इतकी किरकोळ वाढ झाली होती.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत