नागपूर मधून धावणार तिसरी वंदे भारत एक्सप्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

  50

नागपूर : अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ येत्या १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याच दिवशी बेळगाव- बंगळुरु आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णौदेवी कटारा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.


नागपूर मधून सुटणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. यापूर्वी नागपूर ते विलासपूर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. आता नागपूरमधील अजनी ते पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र नियमित फेऱ्या केव्हापासून सुरू होणार याची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही.


नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी ९:५० वाजता सुटेल आणि रात्री ९:५० वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन चालणार नाही पुण्याहून ही ट्रेन सकाळी ६:२५ वाजता सुटून, संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.


अजनी (नागपूर) - पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन स्लीपर वंदे भारत असावी अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र, सध्या ही सेवा एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. एसी चेअर कारचे भाडे सुमारे १५०० रुपये तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ३५०० रुपये असणार आहे.


अजनी (नागपूर) - पुणे अंतर ८५० किलोमीटर इतकं आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या हावडा- पुणे या एक्स्प्रेसला पुणे -नागपूर अंतर पार करण्यासाठी १२ तास ५५ मिनिटे लागतात. तर, पुणे- अजनी एसी स्पेशल ट्रेन १३ तास ३५ मिनिटे वेळ लागतो. अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर १२ तासात पूर्ण करेल. यामुळं या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा