नवी दिल्ली : महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . सध्या LPG गॅस चे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत . याचा फटका मध्यमवर्गीयांना बसत असतो . पण आता LPG गॅस चे दर कमी होण्याची शक्यता आहे . पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यमवर्गीयांना एलपीजी गॅस परवडण्यासाठी ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
ते म्हणाले की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गॅसच्या किमतीत चढ-उतार होत असते . त्यावर नियंत्रण ठेवणे गरजचे आहे . जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल . म्हणून केंद्र सरकार यावर ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान देत आहे . २०२५-२६ साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत १२,००० कोटी रुपयांचे अनुदान मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे . तसेच तांत्रिक शिक्षण संस्थांना बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ४,२०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे .
अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, मंत्रिमंडळाने ४२०० कोटी रुपयांच्या मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन (MERITE) योजनेसाठी अर्थसंकल्पीय सहाय्य मंजूर केले आहे. MERITE अंतर्गत राज्य सरकारी संस्थांना सहाय्य केले जाईल. भारतातील १७५ अभियांत्रिकी संस्था आणि १०० पॉलिटेक्निकना याचा फायदा होईल.