मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षीही घेतला नाही पगार

२०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेच्छेने सोडला होता पगार


कोरोनापूर्वी सलग १२ वर्षे घेत होते वार्षिक १५ कोटींचा पगार


प्रतिनिधी: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षीही कंपनीकडून कोणताही पगार घेतलेला नाही. वित्तीय वर्ष २०२०-२१ पासून अंबानी यांनी कोणतेही वेतन स्वीकारलेले नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. को विड-19 महामारीनंतर उद्भवलेल्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने आपला पूर्ण पगार, भत्ते, निवृत्ती लाभ आणि कोणताही कमिशन घेणे बंद केले होते. कोरोनापूर्वी, २००८-०९ ते २०१९-२० या दरम्यान सलग १२ वर्षे अंबानी यांनी आपले वार्षिक पारिश्रमिक १५ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवले होते. यामागे उद्दिष्ट होते की, व्यवस्थापन स्तरावर इतरांसाठी एक वैयक्तिक आदर्श उभा करणे.


यावर कंपनीने पुढे म्हटले आहे,' लक्षात घ्यावे की कोविड महामारीने भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक परिस्थितीवर मोठा परिणाम केला होता. याचा उल्लेख रिलायंसच्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे.' या अहवालानुसार, कंपनीचे एक्झि क्युटिव डायरेक्टर निखिल मेसवानी यांना वर्षाला एकूण २५ कोटी रुपये वेतन व इतर लाभ मिळतात. त्याचप्रमाणे,त्यांचे धाकटे बंधू हितल मेसवानी यांचेही वार्षिक वेतन २५ कोटी रुपये आहे.रिलायंसचे आणखी एक एक्झिक्युटिव डायरेक्टर पी. एम. एस. प्रसाद यां ना सुमारे २० कोटी रुपये वार्षिक वेतन व इतर लाभ मिळतात.

Comments
Add Comment

Ganapti Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची