'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' ने रचला इतिहास, पहिल्याच आठवड्यात मिळाले तब्बल इतके व्ह्यूज

  55

मुंबई: लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' चा दुसरा सिझन 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'ने टीव्हीच्या दुनियेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या मालिकेने आपल्या लॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल १.६ अब्ज मिनिटांचे व्ह्यूज मिळवून मोठा इतिहास रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही काल्पनिक मालिकेने इतके व्ह्यूज मिळवलेले नाहीत.


एकता कपूर निर्मित या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेची घोषणा झाल्यापासूनच ती प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय होती आणि आता प्रदर्शित झाल्यानंतर तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या प्रेमामुळेच मालिकेने टीआरपी चार्टमध्ये पहिल्याच आठवड्यात नंबर १ चे स्थान पटकावले आहे. इतकेच नव्हे, तर या मालिकेने अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या 'अनुपमा'सारख्या मालिकांनाही मागे टाकले आहे.


एका अहवालानुसार, मालिकेने पहिल्या आठवड्यात १.६५९ अब्ज मिनिटांचे व्ह्यूज मिळवले आहेत. याव्यतिरिक्त, चार दिवसांत ३१.१ दशलक्ष प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली आहे. मालिकेला मिळत असलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल अभिनेत्री आणि आता राजकारणी असलेल्या स्मृती इराणी यांनीही आनंद व्यक्त केला आहे.


'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' ने केवळ एका आठवड्यात जे करून दाखवले आहे, ते आजपर्यंत कोणत्याही मालिकेसाठी शक्य झाले नव्हते.


Comments
Add Comment

बायकोचा आत्मा नवऱ्याच्या शरीरात? ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ची भन्नाट कल्पना आता सिनेमागृहात!

मुंबई : प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा

अभिनेत्री प्रिया बापट करणार हॉरर जॉनरमध्ये पदार्पण : दिसणार नव्या भूमिकेत

मुंबई : अभिनेत्री प्रिया बापट जिने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे . आपल्या

Low Budget Movie : हिरो कोण, व्हिलन कोण? शेवटच्या मिनिटाला उलगडणारा सस्पेन्स; ३ कोटींमध्ये बनून १७ कोटी कमावलेला सिनेमा

सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील कथा प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आल्या आहेत. मोठ्या पडद्यावर असो किंवा OTT

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरून झाला होता वाद

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या

प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न, शेअर केले खऱ्या आयुष्यातील शंभूराज यांच्यासोबतचे फोटो

मुंबई: स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई म्हणजेच खऱ्या आयुष्यातील प्राजक्ताचा साखरपुडा नुकताच संपन्न

मंत्री आशिष शेलार यांनी एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती नेमण्याचे दिले निर्देश

मुंबई : मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा