बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरून झाला होता वाद

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या निजामु्द्दीनमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादात हुमाचे भाऊ आसिफ कुरेशी यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेन परिसरात रात्री उशिरा स्कूटीला गेटवरून बाजूला लावण्यावरून वाद झाला होता. या वादात आरोपींनी आसिफ कुरेशीवर हल्ला केला. गंभीररित्या जखमी झालेल्या आसिफला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत व्यक्तीच्या पत्नीचे आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे की छोट्याशा गोष्टीवरून झालेल्या वादात आरोपींनी निघृणपणे हत्या केली. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या माहितीनुसार पार्किंगवरून याआधीही आसिफ यांचा त्या लोकांशी वाद झाला होता. माझे पती कामावरून परतल्यानंतर त्यांना घरासमोर शेजाऱ्यांनी लावलेली स्कूटी दिसली. ती बाजूला करण्यास सांगितले. मात्र शेजाऱ्यांनी शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला.
Comments
Add Comment

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी